

Akola News
sakal
साखरखेर्डा : येथील पोलिस स्टेशन अंतर्गत गुंज येथे एका वाहनचालक शेतकरी पुत्राने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. विठ्ठल मोतीराम तुपकर (वय ३०) असे या मृत शेतकरी पुत्राचे नाव आहे. विठ्ठल ने स्वतः च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.