

Buldana News
esakal
संग्रामपूर: ‘बारदाना देता का बारदाणा..?’ असे म्हणण्याची वेळ सध्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांवर (डीएमओ) आली आहे. बारदान्याच्या तीव्र टंचाईमुळे प्रशासनाची होणारी नामुष्की टाळण्यासाठी डीएमओंनी संभाजीनगर येथून उसनवारीने बारदाना मागवला. दरम्यान संग्रामपूर येथे पंधरा दिवसांनी केवळ तीन गाठी बारदाना देण्यात आला व तोही एकाच दिवसात संपला. त्यामुळे २८ मार्चपासून पुन्हा खरेदी बंद करण्याचा संदेश देण्याव्यतिरिक्त संस्थेकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. यासंदर्भात ‘सकाळ’ने सलग वृत्त मालिका प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.