अकोल्याच्या संतोषी वडतकरला ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेत पुरस्कार | Mrs. India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोल्याच्या संतोषी वडतकरला ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेत पुरस्कार
अकोल्याच्या संतोषी वडतकरला ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेत पुरस्कार

अकोल्याच्या संतोषी वडतकरला ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेत पुरस्कार

अकोला : मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशन २०२१ च्या माध्यमातून संतोषी धोत्रे वडतकरला भारताच्या पश्चिम विभागाचे ‘फेस ऑफ द वेस्ट’ म्हणून पुरस्कृत केले आहे. ग्लॅमर गुडगाव, दिल्ली स्थित फॅशन इव्हेंट संस्थेच्या संचालिका बरखा नांगिया यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित केली होती. बरखा नांगिया ही स्वत: एक मॉडेल, सौंदर्य आणि फॅशनच्या जगात एक दूरदर्शी व्यावसायिक महिला आहे. संतोषी (३१) ही दोन वर्षांच्या मुलाची आई, संगणक अभियंता आहे.

हेही वाचा: नागपूर : एसटी कर्मचाऱ्याचा भरीत-भाकरीवर ताव

पाच वर्षांपासून कॉर्पोरेट जगतात काम केल्यानंतर, तिने अभिनयाचा पाठपुरावा केला आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आणि क्रीडापटू आहे. या स्पर्धेचा भाग म्हणून संतोषी ही ‘सुंदर डोळे’ या गटात विजेती ठरली आहे. मुकुट जिंकल्यावर संतोषी म्हणाल्या, ‘हा मुकुट मिळणे ही माझ्यासाठी शेवट नसून सुरुवात आहे. गेल्या ३० वर्षांपासून बघत असलेले स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.’

अमरावतीचे माहेर अमरावतीत जन्मलेली संतोषी आता मुंबईत स्थायिक झाली आहे. नागपुरात राहणारे तिचे आई-वडील आणि अकोला येथील सासरच्या मंडळींना तिच्या या कामगिरीचा खूप अभिमान आहे.

loading image
go to top