अकोला : २४ जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार

जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Schools Reopen
Schools Reopen sakal

अकोला : शाळा पुन्हा सुरू करण्याचे अधिकार शासनाने स्थानिक प्राधिकाऱ्यांना प्रदान दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील १ली ते १२ वीच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश शुक्रवारी (ता.२१) पारित केले आहेत. मात्र, महानगरपालिका क्षेत्रातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.

Schools Reopen
कणकवली : पारंपरिक तेल व्यवसायाला नवे रूप

कोरानाच्या तिसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात असून, राज्यात कोविड रुग्णांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेच्या कारणाने शासनाने सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात मोठ्या प्रमाणात कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असून, आता १५ वर्षांवरील मुलांना सुद्धा लसीकरण केले जात आहे. महाविद्यालयीन बहुतांश विद्यार्थ्यांचे सुद्धा लसीकरण झाले आहे. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊन व नियमांचे पालन करून सर्व शाळा पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी इतर पक्ष, शिक्षण संस्थांकडून होत होती. त्यानुसार राज्य सरकारने स्थानिक प्राधिकाऱ्यांना स्थानिक कोविड स्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचे अधिकार प्रदान केले.

Schools Reopen
कोल्हापूर : कारवाईने उतरवला ‘एलसीबी’चा रुबाब

शासन परिपत्रक २० जानेवारी २०२२ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळता इतर भागातील शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा मंजुरी दिली असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना तशी मान्यता दिली आहे. शासन परिपत्रकानुसार आरोग्य विभागाकडून तसेच ग्रामपंचायत/नगरपालिका यांचेकडून जे सहकार्य अपेक्षित आहे ते घेण्याबाबत सूचना आपल्या स्तरावरून शाळांना देण्याचे निर्देश सुद्धा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता.२१) दिले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मात्र, मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारीपासून मनपा क्षेत्रातील शाळा मार्गदर्शक सुचनांचे पालन करून सुरू करण्याचे निर्देश महानगरपालिका क्षेत्रातील १ली ते १२ वीच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी मार्गदर्शक सूचना

शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्‍चित करणे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण (दोन्ही मात्रा) झालेले असावे, शाळेतील १५ ते १८ वर्ये वयोगटातील विद्यार्थांचे शाळेत लसीकरणासाठीचे नियोजन करावे, शिक्षकांची कोविड-१९ बाबतची चाचणी आवश्‍यक, सुरक्षित बैठक व्यवस्था, शारीरिक अंतरच्या नियमांच्या अंमलबजावणीकरिता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे, शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील निर्बंध, पालकांची संमती व पालकांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे, विद्यार्थी-पालक-शिक्षक व समाजातील सदस्य यांना कोविड-१९ च्या संदर्भातील आव्हाने व त्याबाबतची त्यांची भूमीका याबाबत जागरुक करणे, शाळेतील उपस्थितीबाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे आवश्‍यक, शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणिबणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे, इत्यादी मार्गदर्शक सूचना शाळा सुरू होण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत देण्यात आल्या आहेत.

Schools Reopen
अहमदनगर : कर्जत-जामखेडचा चेहरा बदलतोय

गेल्या दोन वर्षांपासून मुलं ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. परंतु, शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये गुरू आणि शिष्य समोरासमोर असतील तर, ती छान होऊ शकते. मुलाचे हाव भाव पाहून त्याने किती आकलन केले हे त्या शिक्षकाला समजते. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असणे गरजेचे असून, शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.

- प्रा. नितीन बाठे, संचालक, समर्थ एज्यूकेशन, अकोला

जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार, महानगरपालिका क्षेत्रात कोविड बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तुर्तास १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील शाळा न सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- कविता त्रिवेदी, आयुक्त, महानगरपालिका, अकोला

शासनाने घेतलेला निर्णयाचे स्वागत आहे. या निर्णयामुळे निश्‍चित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित साधेल. शासनानाच्या मार्गदर्शक सूचनांचे व कोरोना प्रतिबंधक नियमांचे संपूर्ण पालन करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत योग्य खबरदारी घेतली जाईल.

- डॉ. गजानन नारे, संचालक, प्रभात किडस्, अकोला

अशी आहे विद्यार्थी संख्या

इयत्ता मुले मुली एकूण

१ ते ५ ७७३९९ ७०८८१ १४८२८०

६ ते ८ ४५६०५ ४१३२८ ८६९३३

९ ते १२ ५६९८२ ५१६७० १०८६५२

एकूण १७ ९९८६ १६३८७९ ३४३८६५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com