ऑनलाईन व ऑफलाईन स्तरावर सुरू होणार शाळा, प्रायोगिक तत्वावर केवळ इयत्ता पाचवीपासून सुरुवात

सुगत खाडे 
Wednesday, 29 July 2020

खासगी व सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांमधील विषमता दूर करण्यासाठी आता जिल्हा परिषदेतील इयत्ता पाचवीचे वर्ग ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत ऑनलाईन शिक्षणाची सुविधा असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक एक आठवडा ऑनलाईन शिक्षण देतील, तर दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून शिक्षण देण्यात येईल.

अकोला   ः खासगी व सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांमधील विषमता दूर करण्यासाठी आता जिल्हा परिषदेतील इयत्ता पाचवीचे वर्ग ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत ऑनलाईन शिक्षणाची सुविधा असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक एक आठवडा ऑनलाईन शिक्षण देतील, तर दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून शिक्षण देण्यात येईल.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्यात 24 मार्चपासून शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाकडून जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर 26 जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु कोरोचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सावध भूमिका घेत शाळा सुरू करण्यासंदर्भात 15 जून रोजी आदेश जारी केला. त्यामध्ये शाळा सुरु करण्याचे वेळापत्रकच जाहीर करण्यात आले होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी न झाल्याने शिक्षण सुरु करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्याअंतर्गत प्रायोगिकतत्वावरच शिक्षण सुरु करावे लागणार असून, प्रत्येक पंचायत समितीमध्ये एका शाळेत इयत्ता पाचवीचा ऑनलाईन वर्ग होणार आहे. सदर वर्ग पहिल्या आठवड्यात होईल. त्यानंतर मात्र दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षक शिकतील. यावेळी तीन-तीन विद्यार्थ्यांना शिकवण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्रात न येणाऱ्या शाळांमध्ये हे वर्ग सुरु होणार आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात न राहणाऱ्या शिक्षकांनाच शाळेत बोलावण्यात येणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools in Akola to start online and offline, on an experimental basis starting from Class V only