

Schools Must Upload Daily Nutrition Attendance on Portal, Says Education Dept
Sakal
-विनोद पाटील बोडखे
रिसोड: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांनी लाभार्थी, उपस्थितीची माहिती ''सरल'' पोर्टलवर ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक शाळांकडून शाळा स्तरावर वितरित आहाराबाबत दैनंदिन लाभार्थी, उपस्थितीची माहिती नियमित भरली जात नाही. प्रकरणी शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्र देत ज्या शाळा दैनंदिन उपस्थिती भरणार नाहीत अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.