Akola Politics : नेत्यांचे पलायन रोखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान; जि.प. ‘वंचित’च्या हातातून सुटण्याची शक्यता! नेतृत्वाचा अभाव ठरतोय कारणीभूत

Vanchit Bahujan Aghad : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीतील अनेक प्रमुख नेते पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळत असल्याने संघटनात्मक गड्यांवर मोठा परिणाम झाला आहे.
Vanchit Bahujan Aghad
Vanchit Bahujan AghadSakal
Updated on

अकोला : विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पातळीवरील नेते सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांमध्ये अस्वस्थता बघायला मिळत असून अकोला जिल्ह्यात वंचितच्या काही प्रमुख चेहऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकून दुसरीकडे आश्रय घेतला. अलीकडेच जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे व माजी जि.प. सभापती प्रतिभाताई अवचार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने वंचितला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे अकोट व मुर्तिजापूर या वंचितच्या पारंपरिक प्रभाव असलेल्या गडांमध्ये पक्ष संघटन खिळखिळे झाल्याचे दिसते. तर वंचितमधील काही अन्य नेतेही आता काठावर उभे असून ते योग्य वाटा शोधत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com