

Sharad Pawar
esakal
अकोला जिल्ह्यातील एका ग्रामीण तरुणाने लग्न न होण्याच्या दु:खाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. 'मला लग्नासाठी योग्य मुलगी शोधून द्या, मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही,' असे भावनिक आवाहन त्याने केले आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नसमस्येचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.