लसीकरणात शेगाव तालुका नंबर वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

लसीकरणात शेगाव तालुका नंबर वन

sakal_logo
By
संजय सोनोने

शेगाव : शहरासह तालुक्यात कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून जास्तीतजास्त लसीकरणासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नात तहसीलदार समाधान सोनवणे यांनी शेगाव तालुक्यातील नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत लस घेण्याचे आवाहन केले. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन बुलडाणा जिल्ह्यातून शेगाव तालुका लसीकरण मोहिमेत नंबर वन ठरला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने शेगाव शहर व तालुक्याची लसीकरणाची स्थिती पाहता शासकीय यंत्रणा नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करीत आहे. पालिकेसह इतर शासकीय यंत्रणाही शहरातील विविध भागात जाऊन जनजागृती करीत आहेत. तहसिलदार समाधान सोनवणे यांनी स्वतः विविध ठिकाणी जाऊन ''हर घर दस्तक'' मोहीमही सुरू केली. शहरात विशेषतः मुस्लिमबहुल भागात लसीकरणाला प्रतिसाद नसल्याच्या पार्श्र्वभूमीवर या भागाकडेही शासकीय यंत्रणेने आता लक्ष वळवले आहे. या भागात विशेष लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

हेही वाचा: IND VS NZ : रहाणे फॉर्मात येईल : पुजारा

तहसिलदार समाधान सोनवणे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. लसीकरणाच्या अनुषंगाने असलेले गैरसमजही दूर करण्याचा प्रयत्न केला. अठरा वर्षावरील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. वयोवृद्ध मंडळी लस घेतल्यानंतर त्यांचे अनुकरण करण्याचे प्रबोधन करीत आहेत. तिसऱ्या लाटेची भीती असल्याने स्वतः लस घ्यावी व कुटुंबातील प्रत्येक सदस्यालादेखील लस घेऊन सुरक्षित करावे, असे आवाहनही तहसिलदार सोनवणे यांनी केले आहे.

१३ लाख व्यक्तींनी घेतला पहिला डोस

जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण २१ लाख ८७ हजार २९४ पैकी तेरा लाख दहा हजार ८१९ लाभार्थ्यांचा लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी ६२.२७ टक्के आहे. जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ५० टक्के असलेली तेरा केंद्र आहे. तर ५० ते ७५ टक्के डोस दिलेली प्रा. आ. केंद्र ३६ आहे. तसेच ७५ ते १०० टक्के पहिला दिलेली केंद्र ३ आहेत.

जिल्‍ह्याची लसीकरणाची टक्‍केवारी

 • तालुका पहिला डोस दुसरा डोस

 • शेगाव ७५.२५ ३६.९५

 • देऊळगाव राजा ७३.७४ ३३.८९

 • लोणार ७३.१७ ३४.५३

 • जळगाव जामोद ७१.९१ ३१.४५

 • बुलडाणा ६९.८१ ३६.९३

 • नांदुरा ६९.३६ २८.९५

 • चिखली ६९.१३ ३२.०४

 • सिंदखेड राजा ६९.०२ २७.८०

 • खामगाव ६७.०५ २९.७०

 • मलकापूर ६६.५६ ३२.०१

 • मेहकर ६४.६३ २८.४३

 • मोताळा ५७.०६ २३.९७

 • एकुण ६८.३२ ३१.१३

loading image
go to top