Akola Crime : १५ लाखाची खंडणी; शिवसेना नगरसेवक सागर भारुका अटक

हॉटेल व्यावसायिकाकडे १५ लाख रुपयांची मागणी करून धमकावल्याचा आरोप अकोला महापालिकेतील शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक सागर सुभाषचंद्र भारुका यांच्यावर करण्यात आला.
corporator sagar bharuka

corporator sagar bharuka

sakal

Updated on: 

अकोला - हॉटेल व्यावसायिकाकडे १५ लाख रुपयांची मागणी करून धमकावल्याचा आरोप अकोला महापालिकेतील शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक सागर सुभाषचंद्र भारुका यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात मारहाण, खंडणीची मागणी आणि धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भारुका यांना ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी (५ ऑक्टोबर) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com