शिवभोजनने क्षमविली पोटाची भूक, या जिल्ह्यात तब्बल २ लाख ४० हजार थाळ्यांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

टाळेबंदीच्या काळात नागरिकांना सहज भोजन उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यातील १३ शिवभोजन केंद्रातून दररोज १ हजार ५०० थाळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे टाळेबंदीत दोन लाख ४० हजार शिवभोजन थाळ्यांनी गरीबांच्या पोटाची भूक क्षमविली.

अकोला  ः टाळेबंदीच्या काळात नागरिकांना सहज भोजन उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यातील १३ शिवभोजन केंद्रातून दररोज १ हजार ५०० थाळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे टाळेबंदीत दोन लाख ४० हजार शिवभोजन थाळ्यांनी गरीबांच्या पोटाची भूक क्षमविली.

जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० पासून शिवभोजन थाळीची सुरूवात झाली. सुरवातीला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर व सर्वोपचार रूग्णालय या दोन ठिकाणी २०० थाळी प्रतिदिन क्षमतेचे शिवभोजन केंद्र कार्यान्वित झाले. परंतु नंतर कोविड-१९ च्या संकटामुळे शासनाने शिवभोजन थाळीचा वाढीव इष्टांक मंजुर केला. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नवीन शिवभोजन केंद्र १ एप्रिलपासून सुरु करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अकोला शहरातही शासकीय स्त्री रूग्णालय येथे शिवभोजन केंद्र सुरु झाले. या सर्व केंद्रावरून दररोज १५०० याप्रमाणे दोन लाख ४० हजार शिवभोजन थाळीचा लाभ लॉकडाऊन कालावधीत देण्यात आला. विशेष म्हणजे कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या खदान व अकोट फैल परिसरात अनुक्रमे १०० व २०० शिवभोजन थाळींचे वितरण प्रतिदिन करण्यात येत आहे.

माफक दरात भोजन
लॉकडाउच्या काळात जिल्ह्यातील गोरगरिब व्यक्तींना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील अकोला येथे तीन बार्शिटाकळी येथे तीन, तेल्हारा येथे दोन, मूर्तिजापूर येथे दोन तसेच अकोट, बाळापूर व पातूर येथे प्रत्येकी एक या प्रमाणे १३ शिवभोजन थाळी केंद्र सुरू आहेत. सदर केंद्रातून माफक दरात शिवभोजनाचे वाटप करण्यात येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivbhojan forgave hunger, distribution of 2 lakh 40 thousand plates in akola district