

Akola Airport
sakal
अकोला : अकोल्याच्या शिवणी विमानतळावरून प्रवासी विमानांचे टेकऑफ कधी होणार, हा प्रश्न केवळ प्रश्न न राहता नागरिकांचा संताप बनला आहे. तब्बल २०८ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चास वित्तीय मान्यता मिळूनही भूसंपादन, मोजणी, नोटीस आणि बांधकामाचा साधा श्रीगणेशाही न झाल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.