
अकोला ः शिवराज्याभिषे दिनी राजदंडाला गुढीचे स्वरूप देण्याचा शासन आदेश म्हणजे, इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न आहे. हा आदेश मागे घेवून सुधारित आदेश काढावा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे सचिव प्रशांत बुले यांनी केली आहे. (Shivrajyabhishek, Gudi is a distortion of history, Allegations of Maratha Seva Sangh against the government)
शिवराज्याभिषेक दिन भगवाध्वज उभारून साजरा करावा याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्हाला शिवरायांचा एकपाती भगवा ध्वज मान्य आहे. परंतू स्वराज्याचा कलश रयतेच्या झोळीत रिता करणे या अलीकडच्या ‘अलंकारिक’ वाक्याचा गैरफायदा घेत, प्रतिकात्मक राजदंडावर उलटा कलश, गाठी, आंब्याच्या डहाळ्या याला विरोध आहे.
कारण शिवचरित्राच्या कोणत्याही समकालीन साहित्यात असा उल्लेख नाही. अर्थात असे करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या राजदंडाचा अवमान तसेच शिवचरित्राचे, इतिहासाचे विकृतीकरण आहे. शासकीय कार्यालयात धार्मिक प्रतिके उभारण्यास बंदी असताना, सर्वधर्म समभावी शिवछत्रपतींच्या नावाआडून ही धार्मिक प्रतिके लादून, शिवछत्रपतींच्या सर्वधर्मसमभावी भूमिकेचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं शासनाने या शासन निर्णयात बदल करून नवीन आदेश काढावा, अशी मागणी प्रशांत बुले यांनी केली आहे.
संपादन - विवेक मेतकर
Shivrajyabhishek, Gudi is a distortion of history Allegations of Maratha Seva Sangh against the government
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.