तेल्हारा; बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे!, बियाणे विक्रेत्यांनी मारले शिक्के

तेल्हारा; बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे!, बियाणे विक्रेत्यांनी मारले शिक्के

तेल्हारा (जि.अकोला) ः सोयाबीन बियाण्यांबाबत गतवर्षीपासून वाद सुरू आहेत. उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार गतवर्षी उघडकीस आल्याने अनेक कंपन्यांवर कारवाईही झाली होती. त्यातून यावर्षी कंपन्या व बियाणे विक्रेत्यांनी अजब पळवाट काढून बियाणे विकणार, पण जबाबदारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. थेट बियाणे विक्रीच्या देयकावरच शिक्का मारून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न विक्रेते करीत आहेत. (Telhara Akola Soybean Germination Capacity Seed Vendors Stamp)


‘सदर सोयाबीन बियाणे मी झाल्या जबाबदारीवर घेत आहे, तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल’, असा शिक्का तेल्हारा तालुक्यातील सोयाबीन विक्रेत्यांनी देयकावर मारला आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारून त्याची कोणतीही जबाबदारी न घेण्यासारखा आहे. यातून उद्या जर बियाणे उगवलेच नाही आणि विकत घेतलेले बियाणे बोगस निघाले तर त्याची जबाबदारी कुणावर निश्चित करावी, हा प्रश्नच आहे. बियाणे विकत घेणारा शेतकरीच यात फसवल्या जाण्याची भिती अधिक आहे. बियाण्यांची जबाबदारी संबधित कंपनीसोबतच विक्रेत्यांवरही समप्रमाणात राहिल्यास बोगस बियाणे विक्रीला आळा बसतो. मात्र, आता विक्रेते व बियाणे कंपनीच देयकांवर शिक्के मारून जबाबदारी झटकत असेल तर अशा व्यवहारात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारल्या गेल्यास शेतकऱ्याने नुकसान भरपाईसाठी कुणाचे द्वार ठोठवावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तेल्हारा; बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे!, बियाणे विक्रेत्यांनी मारले शिक्के
प्रधानमंत्री आवास योजनेत धनदांडे; सर्व्हे एजन्सी,नगरसेवक व अधिकाऱ्यांचा सांघिक प्रताप



विक्रेत्यांनी झटकले हात, सरकार जबाबदारी घेणार का?
शेतकऱ्यांना बियाणे पुरवण्याची जबाबदारी स्वीकारण्यापासून सरकारपासून सारेच हात झटकत असल्याचे दिसून येत आहे. कृषी सेवा केंद्र दुकानदार थेट देयकावर बियाणे विक्रीनंतर ते कसे निघणार याची जबाबदारी विकत घेणाऱ्यांवरच टाकत आहेत. बिलावर शिक्का मारून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे. बियाणे कंपनीही बियाण्यांच्या उगवण क्षमतेची जबाबदारी घेण्यास तयार नाही तर बियाणे कंपनी व विक्रेत्याला परवानगी देणारे सरकारही जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

तेल्हारा; बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे!, बियाणे विक्रेत्यांनी मारले शिक्के
अजूनही येतो घुंगरांचा आवाज, “कंचनी”चा महालाचं गुढ आहे तरी काय?

मागिल हंगामातील अनुभव वाईट
तेल्हारा तालुक्यातील मागिल वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी केली होती; मात्र बियाण्यांची उगवण क्षमताच कमी असल्याने पेरणीनंतर ते उगवले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी पुन्हा सोयाबीन बियाणे आणून दुबार पेरणी केली. तेही बियाणे क्षमतेनुसार उगवले नाही. त्यामुळे मागिल वर्षी सोयाबीन उत्पादनात घट झाली. यावर्षी पेरणीचे दिवस येत असताना कृषी सेवा केंद्र संचालकांनी बियाणे विकत घेत असताना बिलावर बियाणे न निघाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे शिक्के मारून जबाबदारी झटकली आहे.

बियाणे हा विषय कायद्याच्या अंतर्गत असून, असे शेतकऱ्यांना बांधून घेता येणार नाही, तसेच असे लिहून घेतल्यावर सुध्दा बियाण्यात दोष असल्यास दुकानदार व कंपनीविरुद्ध कारवाई होईल.
- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

संपादन - विवेक मेतकर

Telhara Akola Soybean Germination Capacity Seed Vendors Stamp

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com