

Akola Crime
Sakal
बार्शीटाकळी : पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिस स्टेशन बार्शीटाकळी हद्दीत राहत्या घरात गांजाची लागवड करून विक्री करण्याचा उद्योग उघडकीस आला असून, पोलिसांनी गांजाचे झाड जप्त करत आरोपीस अटक केली आहे.