मालेगाव येथे सराफा व्यावसाईकावर गोळीबार; एकाचा मृत्यू, एक गंभीर

सराफा व्यापारी जुने बस स्थानक येथे पोलीस ठाण्यासमोर जमा झाले
gun firing
gun firingsakal

मालेगाव : मालेगाव येथील अंजनकर ज्वेलर्सचे(Anjankar Jewelers) मालक (owner)योगेश गजानन अंजनकर हे नेहमी प्रमाणे आपले दुकान बंद करून पैशाची बॅग घरी घेऊन जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर आणी त्यांच्या नोकरावर चाकुने वार करून देशी कट्टयाने गोळीबार केला . त्यामधे त्यांचा नोकर गंभीर जखमी झाल्याने त्याला वाशीम येथे तात्काळ नेण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला . ता 21 डिसेंबर रोजी रात्री 9.00 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

योगेश अंजनकर हा गंभीर जखमी झाला होता त्याला अकोला येथे रेफर केले आहे . पैशाची बॅग घेऊन चोरटे पसार झाले आहेत. मालेगांव येथील मुख्य रस्त्यावर अंजनकर ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान आहे . त्या दुकानचे मालक महेश गजानन अंजनकर व त्यांचा लहान भाऊ योगेश अंजनकर आहेत . त्यांनी नेहमी प्रमाणे पावणे नऊ वाजताचे सुमारास आपले दुकान बंद केले .

gun firing
बेळगाव महापालिकेचे स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज, प्रस्ताव मागविले

त्यानंतर योगेश आणी त्यांचा दुकानातील नोकर रवि वाळेकर हे दोघे दुकानातील रक्कम बॅगेमधे घेऊन देशपांडे लॉट च्या मागे असलेल्या कॉलनीतील त्यांच्या घरा कडे मोटार सायकलने जात होते . ते त्यांच्या घराजवळ येताच त्यांच्या मागावर असलेली एक मोटार सायकल त्यांच्या जवळ आली . त्यावर दोघे जण होते . त्या पैकी एकाजवळ चाकु तर दुसऱ्या जवळ देशी कट्टा असल्याचे समजते . चोरट्यांनी अंजनकर व नोकर रवि वाळेकर यांच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकली आणी चाकुने त्यांच्यावर वार केले आणी रवि याच्या डोक्यात गोळी झाडली .

आणी पैशाची बॅग घेऊन चोरटे पसार झाले . गोळीचा आवाज ऐकुन आजुबाजुचे लोक बाहेर आले . त्यांचा आवाज ऐकुन चोरटे घाबरले . त्याच अवस्थे मधे मोटार सायकल घेऊन पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्यांची मोटार सायकल स्लिप झाली . त्यामुळे ती तेथेच सोडुन त्यांच्या साथीदारांच्या मागेच असलेल्या दुसऱ्या गाडीवरून ते पसार झाले . रवि वाळेकर व योगेश अंजनकर यांना जखमी अवस्थे मधे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

gun firing
नागपूर : शेकडो वर्षांनंतर विदर्भात रानटी हत्तीचा मुक्काम

तेथे त्यांच्यावर प्राथामिक उपचार केले . त्यापैकी रवि वाळेकर याला जास्त मार असल्याने त्याला वाशीम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले . तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर योगेश ला अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. या घटनेने संपूर्ण मालेगाव शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . तर रात्री इतक्या लवकर एवढी मोठी घटना शहरात घडल्याने व्यापारी व व्यावसाईक सुद्धा धास्तावले आहेत . पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत

रवी वाळेकर यांचा मृतदेह आज ता 22 रोजी मालेगाव शहरात दुपारी 2.00 वाजताच्या दरम्यान वाशिम येथून आणण्यात आला त्यावेळी सराफा व्यापारी जुने बस स्थानक येथे पोलीस ठाण्यासमोर जमा झाले तिथे वाळेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांनतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सराफा व्यावसायिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com