बार्शीटाकळीत गोळीबार; कापूस व्यवसायाच्या वादातून वाद; तिघे जखमी

बार्शीटाकळीत गोळीबार; कापूस व्यवसायाच्या वादातून वाद; तिघे जखमी
बार्शीटाकळीत गोळीबार; कापूस व्यवसायाच्या वादातून वाद; तिघे जखमी

बार्शीटाकळी (जि. अकोला) ः कापूस व्यवसाच्या आर्थिक स्वरूपाच्या वादातून अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे दोन गटात सोमवारी, सांयकाळी ५.३० वाजताच्या सुमारास झालेल्या हाणामारीत गोळीबार झाला. त्यात अ . साकीब अ . गफ्फार (१९) व शे . नदीम शे. मुनीर (२५ ) व एक रस्त्याने जाणारी महिला असे तिघे जखमी झालेत. अमरावती येथील गुन्हेगारांना आणून प्रतिस्पर्धी व्यावसायिकाचा काटा काढण्याचा प्रयत्न ही घटना घडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. (Shooting in Barshitakali, dispute over cotton business)


बार्शीटकाळी या परिसरात कापूस जिनीन आणि प्रेसिंगचे व्यवसाय सर्वाधिक आहे. त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांकडून कापूस विकत घेणारे अनेक व्यावासायिक आहेत. त्यांच्यापैकी काही व्यावसायिकांमध्ये टोकाची प्रतिस्पर्धा आहे. यातून नेहमीच या व्यावसायिकांचे खटके उडतात.

या वादातूनच बार्शीटाकळी येथील हॅलोपुरा परिसरातील गुड्डू राज नामक या व्यावासायिकाने अमरावती येथील काही गुन्हेगारांना बोलावून प्रतिस्पर्धी व्यावासायिक अब्दुल रहेमान (५०) याच्यासोबत वाद घातला. या वादाचे पर्यावसन दोन्ही गटात हाणामारीत झाले. यात गाड्यांची तोडफोड करण्यात आली. गाड्या उलटून देण्यात आल्यात. यावेळी झालेल्या गोळीबारात तीन व्यक्ती जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी तातडीने अकोला येथे पाठविण्यात आले.

बार्शीटाकळीत गोळीबार; कापूस व्यवसायाच्या वादातून वाद; तिघे जखमी
महाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवर

बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी तातडीने घटना स्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आरोपींचा शोध सुरू केला असून, वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरू होती.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागिय पोलिस अधिकारी राऊत, पो.नि. श्रीरंग सणस, पिंजरचे ठाणेदार पडघन यांनी घटना स्थळ गाठून पाहणी केली. पोलिस कर्मचारी विजय पाटील, पिजंरकर व दिनेश अघडते तसेच बंदोबस्ता करिता आरसीपीचा ताफा बोलावण्यात होता.

संपादन - विवेक मेतकर
Shooting in Barshitakali, dispute over cotton business

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com