esakal | महाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवर
sakal

बोलून बातमी शोधा

महाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवर

महाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


वाडेगाव येथील कृषी सेवा संचालकांची मनमानी; लिक्विड किट घेण्याची सक्ती
कृषी सेवा केंद्र संचालक बिले फाडून बियाणे बुकिंग झाल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत करीत आहे. कृषी सेवा केंद्राच्या सर्व गोदामांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली.


वाडेगाव (जि.अकोला) ः बाळापूर (Balapur) तालुक्यातील वाडेगाव (Wadegaon) येथे कृषी सेवा केंद्रातून (Agro service Center) महाबीज बियाणे (Mahabeej Seeds) घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) सोबत इतर कंपनीचे बियाणे अथवा लिक्विडची किट घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी कृषी सेवा केंद्र संचालकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला होता. (Farmers in Akola do not get Mahabeej seeds)


खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी पेरणीची जुळवाजुळव करीत आहे. बियाणे, खत खरेदीसाठी लगबग सुरू आहे. त्यातच वाडेगाव येथे महाबीज कंपनीचे १५८ व ३३५ या वाणाचे सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गेलेल्या शेतकऱ्यांना या बियाण्यांचा तुटवडा दाखवून महाबीजसोबत इतर महागड्या कंपनीचे बियाणे अथवा लिक्विड किट घेण्याची सक्ती केली जात आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

त्यामुळे वाडेगाव येथे आलेले तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी घेराव घातला. वाडेगावातील कृषी सेवा केंद्र संचालक बिले फाडून बियाणे बुकिंग झाल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत करीत आहे. कृषी सेवा केंद्राच्या सर्व गोदामांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली. यावेळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून न घेता तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: सोयाबीन बियाणे वितरणाचे गौडबंगाल आहे तरी काय ?

मात्र आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घालून गोदामाची तपासणी करण्याच्या आग्रह धरला. त्यानंतर कृषी अधिकारी यांनी गोदामांची तपासणी करण्याची तयारी दाखविली. मात्र, त्यापूर्वीच कृषी सेवा केंद्र संचालक प्रतिष्ठाने बंद करून निघून गेला. शेतकऱ्यांचा रोष बघता वाडेगाव पोलिस चौकीचे उपनिरीक्षक मनोज वासाडे, निखील सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेवून शेतकऱ्यांची समजूत काढली.

हेही वाचा: पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय


कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता खते, बियाण्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता शासनाने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारे खते बी-बियाणे शेतीच्या बांधावर उपलब्ध करून द्यावे.
- मंगेश तायडे, सरपंच, वाडेगाव

महाबीज बियाण्याची ऑनलाइन प्रक्रिया राबविताना प्रत्येक शेतकऱ्यांना बियाणे मिळाले पाहिजे. यामध्ये ड्रॉ पद्धत राबवून मोजक्याच शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देत असाल तर ही प्रक्रिया बंद करा. कोविडच्या काळात शेतकऱ्यांना त्रास देवू नका.
- शरद लांडे, सरपंच, धनेगाव

Farmers in Akola do not get Mahabeej seeds

हेही वाचा: १०३ वर्षांपासून शकुंतला रेल्वेचा लोहमार्ग इंग्रजांकडेच; कधी तुटणार गुलामीच्या बेड्या?

गेल्या खरिपात अतिवृष्टी, अवकाळीचा फटका, रब्बीत उत्पादन निम्‍म्यावर, विम्याची रक्कम अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही, कर्जमाफीचे भिजत घोंगडे, चुकारे रखडलेलेच, नुकसानभरपाईचा पत्ता नाही आणि दोन वर्षांपासून कोविडच्या संकटाने व लॉकडाउनने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बाजार समित्या कधी बंद, कधी सुरू! शासकीय शेतमाल खरेदी नावालाच आहे. अशातच आता शेतकऱ्यांना महाबिज बियाण्यांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बियाणेही नाही उपलबध्द

महाबीजद्वारे सोयाबीन बियाण्याच्या एका बॅगची किंमत २२५० रुपये ठरविण्यात आली. इतर खासगी कंपन्यांनी मात्र, त्यांचे सोयाबीन बियाण्याचे दर २८०० ते ३३०० रुपये ठेवले आहेत. त्यामुळे महाबीजचे बियाणे मिळविण्यासाठी शेकऱ्यांची धावपळ आहे. परंतु, अजूनपर्यंत महाबीजचे बियाणे उपलब्धच झाले नाही, बियाणे संपले, सबडिलर्सला सर्व बियाणे देऊन टाकले, अशी माहिती महाबीजचे डिलर्स देत असून, शेतकरी बियाणे मिळविण्यापासून वंचित राहात असल्याची माहिती शेतकरी जागर मंचच्या संयोजकांनी दिली.

loading image