esakal | कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा अल्प पुरवठा

बोलून बातमी शोधा

पुन्हा २० हजार डोजची बोळवण!
पुन्हा २० हजार डोजची बोळवण!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्याला कोव्हिशील्डच्या रविवारी (ता. २५) २० हजार लशींचा पुरवठा आरोग्य विभागामार्फत करण्यात आला. अल्प पुरवठ्यामुळे केवळ चार दिवसच लसीकरण करता येऊ शकेल. त्यानंतर मात्र पुन्हा कोरोना लसीकरणाचा वेग मंदावेल.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहे. दरम्यान असे असले तरी जिल्ह्याला कोरोना लशींचा अल्प साठा मिळत असल्याने लसीकरण मोहिमेचा वेग मंदावत आहे. दरम्यान रविवारी (ता. २५) कोरोना लशींचे २० हजार डोज जिल्ह्यासाठी मिळाले. सदर साठा अल्प असल्याने जिल्ह्यात पुन्हा लसीकरणाचा वेग मंदावेल.
-------------
अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प
लसीकरण केंद्रातील कोरोना प्रतिबंधात्मक लस संपल्यामुळे सध्या जिल्ह्यातील १५० पैकी बहुतांश केंद्रातून लस देण्याची प्रक्रिया बंद आहे. शनिवारी (ता. २४) व रविवारी (ता. २५) अनेक केंद्रांवर लशींचा साठा संपल्यामुळे लसीकरण बंद असल्याचे फलकच लावण्यात आले होते. त्यामुळे लसीकरणासाठी पोहचणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना परत जावे लागले.
-----------------
संख्या वाढली वेग घटला
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढला आहे. दररोज किमान ६ ते ७ हजार लाभार्थी लस घेत आहेत. परंतु लसींचा अल्प साठा केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग मात्र मंदावत आहे.

संपादन - विवेक मेतकर