esakal | कावड–पालखी उत्सवात ओसंडून वाहला उत्साह, टाळ्यांचा कडकडाट अन् फटाक्यांची आतषबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

कावड–पालखी उत्सवात ओसंडून वाहला उत्साह, टाळ्यांचा कडकडाट अन् फटाक्यांची आतषबाजी

कावड–पालखी उत्सवात ओसंडून वाहला उत्साह, टाळ्यांचा कडकडाट अन् फटाक्यांची आतषबाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातही श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी अकोला शहरातील प्रसिद्ध कावड-पालखी उत्सवाची (kawad palakhi festival akola) परंपरा अबाधित राहिल, याची काळजी घेत मानाच्या श्री राजराजेश्वर पालखीला जलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली. भाविकांची गर्दी नाही, ढोल ताशांचा गजर नाही, तरीही कावडीधारींचा उत्साह ओसंडून वाहत होता.

हेही वाचा: आ.गायकवाड यांनी मद्यधुंद पोलिसाच्या कानाखाली वाजवली

रविवारी रात्रीच गांधीग्रामकडे जल आणण्यासाठी निघालेल्या पालखीचे सोमवारी पहाटे अकोल्यात आगमन झाले. महाराणा प्रताप चौक (सिटी कोतवाली) ते श्री राजेश्वर मंदिरापर्यंत पाखली शिवभक्तांनी खांद्यावर आणली. परवानगी देण्यात आलेल्या शिवभक्तांनी मंदिरात प्रवेश केला आणि जलाभिषेक करुन उत्सवाची परंपरा कायम ठेवली.

पोलिस बंदोबस्तात पालखी -

श्री राजराजेश्वर मंदिर ते गांधीग्राम व पुन्हा मंदिर असा प्रवास केला. पालखीचा वाहनाने प्रवास झाला. पाच मोरी ते मंदिरापर्यंत पोलिसांनी दोन बाजूने दोरीचे कठडेच तयार करीत गर्दी न होण्यासाठी प्रयत्न केला. या कठड्यात वाहनातील पालखी उत्सवात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेले शिवभक्त होते. पालखीसोबत उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार, उपविगापीय पोलिस अधिकारी सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले, वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील, जुने शहरचे ठाणेदार सेवानंद वानखडे, डाबकी रोडचे ठाणेदार शिरीष खंडारे, उपनिरीक्षक सुरेश वाघ यांच्यासह अन्य पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अकोट फैल ते श्री राजेश्वर मंदिरापर्यंत ठिकठिकाणी शिवभक्तांनी पालखीचे स्वागत केले. पालखीवर फुलांची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अकोट रोड, अकोट स्टॅंडजवळ, कापड बाजार परिसर, महाराणा प्रताप चोक, मोठा पूल, जयहिंद चैकात पालखीवर फुले उधळण्यात आली. माणेक टॉकिजसमोर मोठ्या रांगोळ्या काढून फटाके फोडून पालखीचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर दुतर्फा शिवभक्त पालखीच्या पूजनासाठी हार, आरतीचे ताट घेऊन उभे होते. शिवभक्तांनी टाळ्या वाजवून दूरूनच शिवाचे दर्शन घेतले.

loading image
go to top