esakal | शटर डाउन गुटख्याचे मीटर सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

images.jpg

कोरोना काळात शहरात उदयास आले शंभराहून अधिक गुटखामाफिया 

शटर डाउन गुटख्याचे मीटर सुरू

sakal_logo
By
भगवान वानखेडे

अकोला ः कोरोनाने सर्वच क्षेत्रावर परिणाम केला आहे. अगदी अवैध धंद्यावरही. अकोल्यात याच कोरोना काळात शंभरहून अधिक गुटखामाफिया उदयास आले असून, सध्या सर्रासपणे शटर डाऊन करून गुटख्याचे मीटर सुरू असल्याचे चित्र आहे. असे जरी असले अकोला पोलिस याकडे डोळेझाक का करीत आहेत हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

इतर बाबींप्रमाणे अकोला अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून केंव्हाचेच उदयास आले आहे. अशातच अकोल्यात गुटख्याची तस्करी आंध्र आणि मध्य प्रदेशातून होते. अशातच या गुटखा विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असल्याने जुने नवे सगळ्या गुटखामाफियाना कोरोनाच्या टाळेबंदीचा पुरेपूर फायदा घेतल्याचे दिसून आले आहे. कारण, टाळेबंदीत एकट्या अकोला शहरात लाख रुपयांपासून ते कोट्यवधीची उलाढाल करणारे शंभरपेक्षा अधिक गुटखामाफिया उदयास आले असल्याची गुप्त माहीती आहे. तर वाहनांची ये-जा बंद असताना पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अकोला शहरात गुटख्याची कमतरता दिसून आली नाही. तेव्हा हा गुटखा आला आणि येऊ दिला तरी कसा असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

अन बांध्यामागे वाढविले दर
साहेब, लाॅकडाउन आहे. सगळ्यांचेच लक्ष आहे, लपून धंदा कारावा लागत आहेत म्हणून लहान-सहान दुकानदार आणि पानटपऱी धारकांना चढ्या भावाने गुटख्या पुड्या विकल्या जात आहेत. तर हेच पानटपरीधारक त्या गुटखा पुड्या चढ्या भावाने विकत आहेत.

मुख्य सूत्रधार गळाला लागेना
अकोला पोलिसांनी गुटखा पकडला नाही असे नाही. कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, या कारवायांमध्ये केवळ लहान-सहान व्यक्तींवरच कारवाई करण्यात आली आहे. अद्यापही शहरातील नामांकित गुटखा माफिया गळाला लागला नसल्याचे चित्र आहे. तेव्हा मुख्य सूत्रधार गुटखा माफियांना अटक का होत नाही यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर
गुटखा विक्रेत्यांवर कारवाई म्हणजे मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर अशी स्थिती आहे. अधून-मधून थातूर मातूर कारवाई केली जात आहे. तर अद्यापही मोठ्या गोडामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असून, त्यावर कारवाई केली जात नाही.