सिंदखेड राजा तालुक्यातील ७६ पेक्षा जास्त द्राक्ष शेतकऱ्यांची APEDA वर नोंदणी

Sindkhed Raja taluka has become the first taluka in Vidarbha to register for grape crops 2.jpg
Sindkhed Raja taluka has become the first taluka in Vidarbha to register for grape crops 2.jpg

सिंदखेड राजा (बुलडाणा) : दरवर्षी शेतकऱ्यांना ओला किंवा कोरडा दुष्काळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक घेणे कमी केले आहे. शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. तसा विदर्भातील शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावेच लागते. परंतु मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवडीचे नियोजन करून आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःचे द्राक्ष हे परदेशी पाठविण्यासाठी फलोत्पादन विभागामार्फत अपडेटमार्फत शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू केली आहे.

विदर्भामध्ये सिंदखेड राजा तालुका द्राक्ष पिकांसाठी नोंदणी करणारा पहिला तालुका ठरला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६४.२० हेक्टरवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड केली आहे. त्यापैकी ७६ पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ४८.५० हेक्टरची अपडेटमार्फत नोंदणी केलेली आहे. त्यामुळे विदर्भात सर्वात जास्त अपडेटमध्ये नोंदणी केलेला तालुका सिंदखेड राजा ठरला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड राजा तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड व कृषी विभागाचे कर्मचारी फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना जनजागृती करण्याचे काम करत आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी फळबाग शेतीकडे वळले आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये द्राक्ष, मोसंबी, संत्रा, डाळींब, आंबा, भाजीपालाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकरी शेतामध्ये मागेल त्याला शेततळे योजना अंतर्गत अर्ज करून शेतामध्ये शेततळे घेवून फळबागेची लागवड करताना दिसून येत आहे. त्यामध्ये द्राक्ष ६४.२० हेक्टर, मोसंबी १०५.५ हेक्टर, संत्रा ३७.२०, डाळींब ६४.७० हेक्टर, आंबा ४०.९० हेक्टरी, भाजीपाला ८०.३५ हेक्टर, सीताफळ ८५ हेक्टर, पेरू ४५ हेक्टर वर लागवड केली आहे.

ऑनलाईन द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता अपेडामार्फत फार्म रजिस्ट्रेशन कनेक्ट मोबाईल ॲप्सद्वारे शेतकऱ्यांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिंदखेड राजा तालुका कृषी विभागाकडून फळबाग क्षेत्र असलेल्या गांवामध्ये जावून जनजागृती व अपेडा नोंदणी संदर्भात माहिती दिली जात आहे. त्यामुळे यावर्षी सिंदखेडराजा तालुक्यातील द्राक्ष परदेशी जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे.

हे ही वाचा : अकोल्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
शेतकऱ्यांचे द्राक्ष बागेसाठी योग्य नियोजन
 
सिंदखेड राजा तालुक्यातील द्राक्ष बाग शेतकरी योग्य प्रकारे नियोजन करताना दिसून येत आहे. तालुक्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन द्राक्ष शेती यशस्वी करत आहे. शेततळे, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून छोटे-मोठे कट्टे, शेतकऱ्यांनी आता पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून ठिबक पद्धतीचा वापर करत फळबाग शेती करताना दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकताना दिसत आहे.

असे करा अपेडामार्फत रजिस्ट्रेशन 

फलोत्पादन विभागाने अपडेट यामार्फत 'फार्म रजिस्ट्रेशन कनेक्ट ' मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अँड्रॉइड मोबाईल ॲप्समध्ये गुगल प्ले स्टोअर द्वारे 'अपेडा 'हे विकसित केलेले फार्मा रजिस्ट्रेशन मोबाईल ॲप डाऊनलोड करावे. त्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीचे स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार नंबर व ई-मेल आयडी ही माहिती भरावी लागणार आहे. भरल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध होत आहे. काही अडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग शेतीकडे वळले आहे. त्यामध्ये द्राक्ष बाग प्रामुख्याने घेतल्या जात आहे. शेतकरी फळबाग शेतीकडे वळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील द्राक्ष बाग शेतकऱ्यांना अपेडावर ७६ पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे विदर्भात सिंदखेड राजा अपेडावर नोंदणी करणारा तालुका ठरला आहे. त्यामुळे तालुक्यातील फळबाग व भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी नोंदणीसाठी संपर्क करावा.
- वसंतराव राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेड राजा 

यावर्षी अपेडा द्राक्ष बागेची नोंदणी केल्यामुळे स्वतःच्या शेतातील द्राक्ष परदेशात निर्यात करू शकतो. त्याच प्रमाणे थेट स्थानिक बाजार पेठेमध्ये विक्री करण्याची संधी फळबाग शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेवून फळबाग शेतीकडे वळला आहे. त्यामुळे शेतकरी आधुनिक शेती करताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यात मोठी मदत होणार आहे.
- परमेश्वर किंगरे, द्राक्ष बागायतदार शेतकरी, सिंदखेड राजा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com