esakal | Akola; नियमांचे उल्‍लंघन केल्‍यामुळे स्‍कायलार्क कोविड केअर सेंटर सिल
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर

Akola; नियमांचे उल्‍लंघन केल्‍यामुळे स्‍कायलार्क कोविड केअर सेंटर सिल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


अकोला ः नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी हॉटेल स्कायलार्क येथे सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर महानगरपालिकेद्वारे सिल करण्यात आले आहे. आयसीयुतील रुग्ण संख्या बघता हा विभाग सोडून इतर विभाग सिल करण्यात आले. (Skylark Covid Care Center at Akola Sil)

हेही वाचा: कोरोनाकाळातही १० टक्के पगारवाढ अन् रोजगारही


महानगरपालिका क्षेत्रामधील पूर्व क्षेत्रांतर्गत टॉवर रोडवरील स्‍मार्ट ब्रेन्‍स हाउस प्रा.लि. स्‍कायलार्क कोविड केअर सेंटर येथे पाहणी केले असता त्‍यांनी बॉम्‍बे नर्सीग ॲक्‍टनुसार कोणतीही परवानगी न घेता अतिदक्षता विभागासह कोविड केअर सेंटर सुरू केले असल्‍याचे आढळून आले. त्‍यांना १५ दिवसांची नोटीस देण्‍यात आली होती. त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई सुध्‍दा करण्‍यात आली होती. परंतू त्‍यांच्‍याकडून योग्‍य तो प्रतिसाद न मिळाल्‍याने तसेच त्‍यांनी दिलेले स्‍पष्‍टीकरण हे सुसंगत नसल्‍यामुळे आणि त्‍यांनी अद्यापपर्यंत बॉम्‍बे नर्सिग ॲक्‍टनुसार कोणतीही परवानगी घेतलेली नासल्‍याने ता.१२ जून रोजी मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांच्‍या आदेशान्‍वये त्‍यांचा आय.सी.यु. मध्‍ये व्‍हेन्‍टीलेटरवर रुग्‍ण भरती असल्‍यामुळे ते वगळून स्‍पेशल रूम, आर.एम.ओ.रूम सोबत इतर विभागांवर सिल लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली आहे.

हेही वाचा: ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले दोन हजार!

आय.सी.यु.मधिल रुग्‍ण बरे झाल्‍यावर त्‍यावर सुध्‍दा सिल लावण्‍याची कारवाई करण्‍यात येणार असल्‍याबाबत मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.अस्मिता पाठक यांनी सांगितले आहे. या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर मुदगल, वैद्यकीय आरोग्‍य विभागाचे मनीष पाटील, किरण शिरसाट, राजन खेते आदिंची उपस्थिती होती.

Skylark Covid Care Center at Akola Sil

loading image