तब्बल ५ मिनिटे ४८ सेंकद राहणार सूर्यग्रहण, वाचा कधी आहे ग्रहण

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 17 June 2020

जूनमधील दुसरे ग्रहण रविवार, २१ जून २०२० रोजी लागणार आहे. सन २०२० मधील पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारताच्या काही भागात कंकणाकृती दिसणार असून, काही भागात ते खंडग्रास प्रकारात दिसणार आहे.

अकोला  ः जूनमधील दुसरे ग्रहण रविवार, २१ जून २०२० रोजी लागणार आहे. सन २०२० मधील पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारताच्या काही भागात कंकणाकृती दिसणार असून, काही भागात ते खंडग्रास प्रकारात दिसणार आहे.

गेल्या वर्षी २६ डिसेंबर २०१९ रोजी सूर्यग्रहण झाले होते. यानंतर लगेचच सहा महिन्यांनी सूर्यग्रहण होणार आहे. डिसेंबरप्रमाणे जून महिन्यात होणारे सूर्यग्रहणही मोठे असणार आहे. ज्येष्ठ अमावास्येला असणारे हे सूर्यग्रहण तब्बल ५ तास ४८ मिनिटे चालणार आहे. देशभरातील अनेक ठिकाणी सूर्यग्रहणाचा वेध, वेळ आणि समाप्ती वेगवेगळी असणार आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कधी व ​कसे दिसणार सूर्यग्रहण?
जागतिक पातळीसह भारतातही अनेक ठिकाणी २१ जून २०२० रोजी लागणारे सूर्यग्रहण कंकणाकृती प्रकारात दिसेल. हे ग्रहण वलयाकार असेल. या ग्रहणात सूर्याचा ९९ टक्के भाग झाकला जाईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास सूर्य आणि पृथ्वीच्या मधे चंद्र आला की, सूर्यग्रहण घडते. त्यामुळे सूर्याचा संपूर्ण प्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. जागतिक पातळीवर हे ग्रहण सकाळी ९ वाजून १६ मिनिटांपासून सुरू होणार असून, २ वाजून २८ मिनिटांनी ते संपेल.

कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात कुठे दिसणार?
सन २०२० मधील पहिले सूर्यग्रहण ज्येष्ठ अमावास्येला लागणार आहे. सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येच्या आसपासच दिसते, असे सांगितले जाते. सन २०२० मधील हे एकमेव कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. संपूर्ण भारतातून हे ग्रहण खग्रास पद्धतीने दिसणार नाही. देशाच्या काही भागातून हे सूर्यग्रहण कंकणाकृती पद्धतीने दिसेल. पैकी मसुरी, टोहान, चमोली, कुरुक्षेत्र, डेहराडून या भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. त्याचप्रमाणे देशाच्या वेगवेगळ्या भागातून सूर्य कमी-अधिक प्रमाणात झाकल्याचे दिसेल.

सूर्यग्रहणः २१ जून २०२०

  • ग्रहण स्पर्शः सकाळी १० वाजून ०१ मिनिट
  • ग्रहण मध्यः सकाळी ११ वाजून ३८ मिनिटे
  • ग्रहण मोक्षः दुपारी १ वाजून २८ मिनिटे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solar eclipse will last for 5 minutes and 48 seconds, read when is the eclipse akola marathi news