
Karanja Soybean
sakal
कारंजा : खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. या पिकाची काढणी सध्या सुरू असून, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीनची आवक हळूहळू वाढू लागली आहे. ४ ऑक्टोबर रोजी तब्बल २०० क्विंटल नवीन सोयाबीनची नोंद झाली. यावेळी सरासरी दर ३६०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला असून, दर स्थिर असले तरी पावसाचा प्रभाव अद्याप जाणवत आहे.