esakal | सोयाबीन फुलोऱ्यावर येताच भावात घसरण, आता क्विंटलला इतका दर
sakal

बोलून बातमी शोधा

soybean

सोयाबीन फुलोऱ्यावर येताच भावात घसरण, आता क्विंटलला इतका दर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कधी नव्हे तो हमीभावापेक्षा अधीक, नव्हे तर आजपर्यंतचा उचांकी दर गेल्या हंगामातील सोयाबीनला मिळाला. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव (Soybean rate) मिळाला. त्यामुळे सुरू हंगामातील उत्पादनालाही चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, हंगामातील सोयाबीनचे पीक फुलोऱ्यावर येताच बाजार समितीमध्ये (akola apmc soybean rate) भावाची घसरण सुरू झाली आहे.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

जिल्ह्यासह विदर्भात खरिपामध्ये सर्वाधिक पेरा असणारे व सर्वाधिक उत्पादीत होणारे पीक म्हणजे सोयाबीन. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या खरिपामध्ये सोयाबीन पिकापासून सर्वाधिक अपेक्षा राहतात. परंतु, दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, किडीचा प्रादूर्भाव व इतर कारणांमुळे सोयाबीन पिकाचे उत्पादन सातत्याने घटत आहे. सोबतच व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षाही कमी दराने म्हणजे दोन ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दरानेच सोयाबीनची खरेदी होत असल्याने सोयाबीन उत्पादकांना सातत्याने नुकसान सोसावे लागले आहे. शासनाच्या हमीभाव केंद्रावर सुद्धा सोयाबीन विक्री करताना शेतकऱ्यांना विविध अटी, शर्तीची पुर्तता करावी लागते. त्यातही कोणत्या ना कोणत्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण उत्पादनाची खरेदी होत नाही व झाली तरी, चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांना महिनो प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना अल्पदरातही त्यांचे सोयाबीन विकायला तयार होतात. मात्र, गेल्या हंगामात बाजार समित्यांमध्ये पहिल्यांदाच हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला. त्यामुळे हमीभाव केंद्रापेक्षा बाजार समित्यामध्ये आवक अधिक राहाली, तरीसुद्धा भाववाढ सुरू राहाली. ऑगस्टमध्ये तर सोयाबीनने दहा हजाराचा आकडाही पार केला. ही भाववाढ लक्षात घेता नव्या सोयाबनला सुद्धा चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, अजून दिल्ली दूर अशी स्थिती असून, सुरू हंगामातील पीक बहरायला लागताच बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव घसरायला सुरूवात झाली असून, दहा हजारावरून सहा हजारावर उतरले आहेत.

यंदा सोयाबीनची पेरणी १०५ टक्के

गत खरिपात सोयाबीनचे उत्पादन घटले असले तरी, हाती आलेल्या उत्पादनाला बाजार समितींमध्ये हमीभावापेक्षा दुप्पट, तिप्पट भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सुद्धा सोयाबीन पेरणीलाच प्रथम पसंती दिली. त्यामुळे कृषी विभागाने आखलेल्या दोन लाख १८ हजार ८६ हेक्टरच्या तुनलेत १०५ टक्के म्हणजे दोन लाख २९ हजार ४५२ हेक्टरवर जिल्ह्यात सोयाबीन पेरणी झाली आहे.

loading image
go to top