Akola News: अकोला जिल्ह्यात १६ लाख मतदारांची घराघरात पडताळणी; विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत दुबार नावे व मृत मतदार हटवले जाणार

Special Voter Verification Campaign in Akola: अकोला जिल्ह्यात १६ लाखांहून अधिक मतदारांची घराघरात पडताळणी होणार. विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत मतदार यादीतील दुबार नावे, मृतक मतदार व स्थलांतरित मतदारांची नोंद तपासली जाईल.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (आसआयआर) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे.

या मोहिमेंतर्गत राज्यातील तब्बल ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. अकोला जिल्ह्यातही १६ लाखांहून अधिक मतदारांची माहिती घराघरात जाऊन तपासली जाणार असल्याने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com