वादळी वाऱ्यासह पावसात भिजत उपोषण सुरू; पोलिस ताफ्यात वाढ

वादळी वाऱ्यासह पावसात भिजत उपोषण सुरू; पोलिस ताफ्यात वाढ

तेल्हारा ः तेल्हारा तालुक्यातील समस्त जनतेला भेळसावत असलेल्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात व्हावी याकरिता चौथ्या दिवशीही पावसात भिजत विशाल नांदोकार यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांच्या रास्त मागण्या लक्षात घेता विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जाहीर पाठिंबा दिला असून, काहीजणांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन दिले आहे. यामुळे हे आंदोलन मोठे स्वरूप घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सुद्धा आपल्या ताफ्यात वाढ केली आहे. (Start a fast soaked in rain with gale force winds; Increase in police contingent)

वादळी वाऱ्यासह पावसात भिजत उपोषण सुरू; पोलिस ताफ्यात वाढ
लसीकरणाची गती वाढणार, १३ हजार डोस मिळाले


विशाल नांदोकार या सामाजिक कार्यकर्त्यांने तेल्हारा तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांच्या कामाला तत्काळ सुरुवात व्हावी याकरिता ता.२६ जूनपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या रास्त मागणीला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच समस्त नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, पाठिंबा सुद्धा व्यक्त केला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसात भिजत उपोषण सुरू; पोलिस ताफ्यात वाढ
वादळी वाऱ्यासह पावसाचे बाळापूर शहरात थैमान

आंदोलनांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. पाठिंबा देणाऱ्यामध्ये व्यापारी संघटना, नाभिक संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, तेल्हारा विकास मंच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, युवा क्रांती विकास मंच, शेतकरी संघटना, पत्रकार संघटना, मारवाडी युवा मंच, शिक्षक संघटना, सरपंच संघटना, मेडिकल संघटना, हमाल व्यापारी संघटना, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, श्री संत सावता माळी युवक संघ, राष्ट्रीय वारकरी परिषद, कुणबी युवक संघटना, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, युवा स्वाभिमानी पार्टी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ, एलआयसी परिवार, आजी माजी सैनिक संघटना, ऑटो युनियन संघटना, वान पाणी बचाव संघर्ष समिती, वारकरी क्रांती सेना, माहेश्वरी मंडळ, तालुका कृषी व्यावसायिक संघटना, संस्कार भारती शाखा तेल्हारा, शिवभक्त मंडळ, ग्रामपंचायत कार्यालय गाडेगाव, उद्योजक संघटना, ग्रामपंचायत दुदगाव, लोकजागर मंच, इंजिनीअर असोसिएशन, एसटी वाहतूकदार संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, इत्यादी सामाजिक संघटना राजकीय पक्ष तथा बहुसंख्य नागरिकांनी लेखी स्वरूपात आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसात भिजत उपोषण सुरू; पोलिस ताफ्यात वाढ
जिल्हा परिषद-पंचायत समितीची पोटनिवडणूक, उमेदवारीची प्रक्रिया आजपासून


लोकप्रतिनिधींन बद्दल आक्रोश
या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तेल्हारा तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांबाबत कुठल्याही प्रकारची सुरुवातीपासून दखल न घेतल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्याला संपूर्णपणे लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे अनेकांनी उपोषणस्थळी भेट दिली असता लेखी स्वरुपात प्रतिक्रिया व्यक्त करून लोकप्रतिनिधींनी बद्दल चीड व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागाच्या लोकप्रतिनिधींनी आतातरी दयनीय अवस्था झालेल्या तालुक्यातील रस्त्यांबाबत पुढाकार घेऊन ठेकेदार वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय घड़वुन तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Start a fast soaked in rain with gale force winds; Increase in police contingent

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com