gaurav bayaskar
sakal
अकोला - बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निंबा–तेल्हारा मार्गावर स्थित कारंजा फाट्याजवळ सोमवारी एका विद्यार्थ्याची बेदम मारहाण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. गौरव बायस्कार (वय-२०) असे मृत युवकाचे नाव असून काही तरुणांसोबत झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.