esakal | खरीप पेरणी लांबल्यास सूर्यफूल उत्तम आपात्कालीन पीक
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप पेरणी लांबल्यास सूर्यफूल उत्तम आपात्कालीन पीक

खरीप पेरणी लांबल्यास सूर्यफूल उत्तम आपात्कालीन पीक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः खरीपातील मुख्य पीक म्हणून, सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडिदाची सर्वाधिक पेरणी अकोल्यासह वऱ्हाडात होते. मात्र, काही अपरिहार्य कारणाने पिकांची पेरणी लांबल्यास, आपात्कालीन पीक म्हणून, सूर्यफूलाची पेरणी उत्तम ठरू शकते. पावसाचा अधिक ताण सहन करून, कमी खर्चात हे पीक येत असले तरी, अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानासोबत सुधारित वाणाची निवड करावी, असा सल्ला अकोला कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. जीवन कतोरे यांनी दिला आहे. (Sunflower is an excellent emergency crop if kharif sowing is delayed)

हवामान
सूर्यफुलाचे ७०० ते १००० मिमी पावसात चांगले उत्पादन येते. कमी पावसाच्या भागातही हे पीक परिस्थितीशी जुळवून घेणारे आहे. परंतु, ५ पेक्षा कमी व ४० अंशसेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात नुकासान होऊ शकते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. सूर्यफुलानंतर सूर्यफुलाचे पीक घेण्याचे शक्यतो टाळावे. भारी व पोयट्याच्या सुपिक जमिनीत हे पीक उत्तम येते.

हेही वाचा: ताई तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय, अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्टबियाण्याचे हेक्टरी प्रमाण
सरत्याने पेरणी करावयाची असल्यास सुधारीत वाणाचे ८ ते १० किलो किंवा टोकून करावयाची असल्यास संकरीत वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे वापरावे.

वाणाची निवड
खरीपात आपात्कालिन सूर्यफूल पीक लागवड करावयाची असल्यास, फिकेव्ही एसएच-२७, केबीएसएच-१, केबीएसएच-४४ या संकरीत वाणीची व माँर्डन, पिकेव्ही एसएफ-९, टिएएस-८२ या शुद्ध/सुधारीत वाणांची पेरणीसाठी निवड करावी.

बिजप्रक्रिया
पेरणीपूर्वी बियाण्यास प्रतिकिलो ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बन्डॅझिम आणि ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. अझोटोबॅक्टर व स्फूरद विरघळणारे जीवाणू यांची २५० ग्रॅम प्रति१० किलो बियाण्यास लावून बीजप्रक्रिया करावी.

पेरणीची पद्धत
सुधारीत वाणाची पेरणी सरत्याने करून दोन ओळीत ४५ सेंमी अंतर ठेवावे. दोन झाडात ३० सेंमी अंतर ठेवावे. संकर वाणांची टोकून लागवड करते वेळी दोन ओळीत ६० सेंमी तर दोन झाडात ३० सेंमी अंतर ठेवावे.

रासायनिक खते
सूर्यफूल हे पीक रासायनिक खतांसाठी संवेदनशील आहे. सुधारीत वाणांसाठी ६० किलो नत्र व ६० किलो स्फूरद व संकर वाणांसाठी ८० किलो नत्र व ६० किलो स्फूरद प्रतिहेक्टरी वापरावे. यापैकी अर्धे नत्र, उरलेले नत्र पेरणीनंतर एका महिन्याने द्यावे. रासायनिक खत मात्र सरळ खतातून द्यावी. जमिनीमध्ये पालाशची कमतरता असल्यास ३० किलो प्रतिहेक्टरी पालाश द्यावे. याकरिता ५० किलो म्युरेट आॅफ पोटॅश द्यावे.

तणनाशकाचा वापर
पेरणीपूर्वी फ्ल्युक्लोरॅलीन हे तणनाशक २ लिटर प्रतिहेक्टरी ५०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारीवे.

उत्पादन
सुधारीत लागवड तंत्राचा वापर केल्यास सुधारीत वाणाचे १० ते १२ क्विंटल हेक्टरी आणि संकर वाणाचे १५ ते १८ क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळू शकते.

Sunflower is an excellent emergency crop if kharif sowing is delayed

loading image