esakal | फेरफारसाठी लाच मागणारा गायगावचा तलाठी गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

फेरफारसाठी लाच मागणारा गायगावचा तलाठी गजाआड

फेरफारसाठी लाच मागणारा गायगावचा तलाठी गजाआड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः बाळापूर तालुक्यातील बोरवाकळी येथील शेतकऱ्याला फेरफारसाठी लाच मागणाऱ्या गायकावच्या तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अटक केली. अटक करण्यात आलेला तलाठी प्रमोद पुंडलिकराव लांडगे (४५) हा मोठी उमरी फत्तेपूर वाडी अकोला येथील रहिवाशी आहे. (Talathi of Gaigaon arrested for soliciting bribe for change)

हेही वाचा: दोन सभापतींसह १४ सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेचे वेध


तक्रारदार यांच्या बक्षीस पत्राची नोंद फेरफार रजिस्टरला घेऊन तसा सातबारा, आठ (अ) नमुना , फेरफारची नक्कल देणेसाठी तलाठी लांडगे यांनी सात हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने नाईलाजास्तव दोन हजार रु.तक्रार देण्यापूर्वी दिले.

हेही वाचा: आई रुक्मिणी माता विदर्भातील इतर दिंड्यांना पदरात घेतील का?

उर्वरित पाच हजार रुपयांपैकी गुरुवारी तक्रारदारकडून गायगाव तलाठी सांझा येथे तीन हजार रुपये लाच स्वीकारल्याने आलोसे रंगेहात पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे. ही कारवाई अकोला येथील लाचलुचपंत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आली.

संपादन - विवेक मेतकर

Talathi of Gaigaon arrested for soliciting bribe for change

loading image
go to top