esakal | दोन सभापतींसह १४ सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेचे वेध
sakal

बोलून बातमी शोधा

दोन सभापतींसह १४ सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेचे वेध

दोन सभापतींसह १४ सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेचे वेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोज भिवगडे
अकोला ः इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसींसाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या १४ सदस्यांच्या पदांना ग्रहण लागले. त्यांची पद रद्द झाली. सदस्यत्वावर गडांतर आल्याने जि.प. च्या दोन विद्यमान सभापतींसह एकूण १४ सदस्यांवर ‘बेरोजगारी’ची कुऱ्हाड कोसळली. आता त्यांना पुन्हा जि.प.चे वेध लागले असून, ते आपआपल्या पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवित आहे. (14 members including two chairpersons Zilla Parishad again)

हेही वाचा: शेतकरी झाला करोडपती, सोयाबीन बाजारात न विकता बियाणे करून विकले


जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या विषयी सर्वप्रथम नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी सुरू असतानाच काही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात झाला. त्यामुळे आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान, प्रकरणावर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा २७ टक्के नुसारच निश्चित करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेच्या ओबीसीसाठीच्या १४ जागांवर गडांतर आले. त्याचा फटका विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना बसला.

हेही वाचा: शिवसेना-राष्ट्रवादीचे घोडे एका जागेवर अडले

त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन विद्यमान बांधकाम व शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी व महिला व बाल कल्याण समिती सभापती मनीषा बोर्डे यांचा समावेश आहे. ते आता पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून नेत्यांच्या मागे फिरत आहे. वंचितनेही अद्याप झाकली मूठ सव्वालाखाची ठेवून बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न चालविला आहे.

हेही वाचा: आघाडी सरकारचे अपयश झाकण्यासाठी भुजबळ, वडेट्टीवारांचा खोटारडेपणा

यांना पुन्हा निवडणुकीचे वेध
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा खालील जिल्हा परिषदेच्या सदस्यांना फटका बसला. निवडून आल्यानंतर दीड वर्षातच त्यांचे सदस्य पद रद्द झाले. त्यामध्ये वंचितच्या आठ सदस्यांमध्ये दानापूर (स्त्री) सर्कलच्या दीपमाला दामधर, अडगाव (स्त्री) सर्कलच्या प्रमोदिनी कोल्हे (वंचित), तळेगावच्या (स्त्री) संगीता अढावू, कुरणखेडच्या जि.प. सदस्या व महिला व बाल कल्याण सभापती मनीषा बोर्डे, कानशिवणी सर्कलचे जि.प. सदस्य आणि बांधकाम व शिक्षण समिती सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी, अंदुराचे संजय बावणे, देगावचे रामकुमार गव्हाणकर, शिर्लाचे सुनील फाटकर यांचा समावेश आहे. त्यासोबच भाजपच्या कुटासा (स्री) सर्कलच्या कोमल पेटे, बपोरीच्या माया कावरे, घुसरचे पवन बुटे, अकोलखेड येथून निवडून आलेले कॉंग्रेसचे गजानन डाफे, शिवसेनेचे लाखपूर येथील अप्पू तिडके व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दगडपारवा (स्त्री) येथून निवडून आलेल्या सुमन गावंडे यांचा समावेश आहे. या सर्वांना आता पुन्हा निवडणुकीचे वेध लागले आहे.

हेही वाचा: पाच हजार द्या, मिळवा कोरोना पॉझिटीव्‍ह स्‍वॅब !

मुलाखती दिल्या, यादी गुलदस्त्यात!
भाजपतर्फे तिन्ही उमेदवारांनी पुन्हा मुलाखती दिल्या आहेत. वंचितच्या यातीत किती जणांचा समावेश झाला हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असले तरी आठपैकी चौघांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काहींना त्यांच्या कुटुंबातील महिलांना निवडणूक लढविण्याचा सल्ला देण्यात आल्याचीही माहिती आहे. भाजपनेही त्यांचे पत्ते उघडले नाही. काँग्रेस सर्व जागा पुन्हा लढविणार असल्याने त्यांचा एकमेव सदस्य गजानन डाफे पुन्ही रिंगणात असेल यात शंका नाही. शिवसेना अप्पू तिडके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून सुमन गावंडे यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते.

संपादन - विवेक मेतकर

14 members including two chairpersons Zilla Parishad again

loading image
go to top