कोविडमुळे पालक गमाविणाऱ्या बालकांसाठी टास्क फोर्स

बालकांच्या पुनवर्सनासाठी बाल कल्याण समितीचा पुढाकार
कोविडमुळे पालक गमाविणाऱ्या बालकांसाठी टास्क फोर्स
Updated on

अकोला ः कोविड -१९ (Covid-19) महामारीमुळे आई आणि वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांना त्यांचे पालनपोषण, यथायोग्य संरक्षण व संगोपनाच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा बालकांचा पुनर्वसनासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. या बालकांच्या पुनवर्सनाची जबाबदारी बाल कल्याण समिती घेणार आहे. Task force for children who lose their parents due to covid

पालकांचा आधार गमावून बसलेल्या बालकांचा शोध घेऊन बाल कल्याण समितीकडे किंवा संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे माहिती देण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी नितीन खंडागळे यांनी केले.

कोविडमुळे पालक गमाविणाऱ्या बालकांसाठी टास्क फोर्स
सावधान; ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात बालकांच्या काळजी व संरक्षणाकरीता कृती दलाची बैठक आयोजीत करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुळकर्णी, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव राजेश देशमुख, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. सुनिल मानकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, संगिता ठाकुर, सुनिल सरकटे आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत कोरोनाचा विषाणूचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे कोवीड-१९ बाधीत व्यक्तींचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. त्यात काही बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत.

कोविडमुळे पालक गमाविणाऱ्या बालकांसाठी टास्क फोर्स
जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव

या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता असते तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता असते. बालकांचे शोषण होवू नये व त्यांचे संरक्षण व पालनपोषण व्हावे याकरीता अधिनियमान्वये कृती दल गठीत करण्यात आले आहे. या कृती दलामार्फत पालक गमावलेल्या बालकांचे पालनपोषण व संरक्षण करण्यात येणार आहे.

कोविडमुळे पालक गमाविणाऱ्या बालकांसाठी टास्क फोर्स
कोरोनाचे रुग्ण घटले, मृत्यू दर कायम!

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मरसाळे यांनी याबाबत माहिती दिली की, आई किंवा वडील तसेच दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा कोरोनाची लागण झाली असल्यास अशा १८ वर्षाखालील बालकांची तात्पुरत्या व दीर्घकाळ स्वरुपाचे पुर्नवसनासाठी बाल कल्याण समितीकडे दाखल करावे. जेणे करुन अशा बालकांना बालगृहांमध्ये पुर्नवसन करण्यात येणार आहे.

संपादन - विवेक मेतकर

Task force for children who lose their parents due to covid

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com