Akola News : अकोला जिल्ह्यात सरासरी ४७ टक्के मतदान

मतदान शांततेत; २३ हजार ७४० मतदारांनी बजावला हक्क
Teacher Constituency Election akola election update Average voting 47 percent
Teacher Constituency Election akola election update Average voting 47 percentesakal

अकोला : पाच जिल्ह्यात विखुरलेल्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीअंतर्गत साेमवारी (ता. ३०) जिल्ह्यातील ६१ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सर्वच मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले.

दिवसभर चाललेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४६.९१ टक्के मतदान झाले. मतदानानंतर सर्व मतपेट्‍या जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आल्या असून त्या पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत बडनेरा येथील मतमोजणी स्थळी नेण्यात येणार आहेत. दरम्यान मतदानानंतर २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघावर सलग ३० वर्षे ‘नुटा’ या संघटनेचे वर्चस्व होते. सन् २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजित पाटील यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे बी.टी. देशमुख यांचा पराभव केला. त्‍यानंतर या मतदारसंघावर राजकीय पक्षांचा प्रभाव वाढत गेल्याचे दिसून आले.

अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यात विखुरलेल्या या मतदारसंघात मतदार नोंदणी करताना शासकीय यंत्रणेसह राजकीय पक्षांना चांगला कस लागला. दरम्यान जिल्ह्यात ५० हजार ६०६ पदवीधर मतदारांची नोंद झाली. मतदानाच्या दिवशी सोमवारी (ता. ३०) महापालिका क्षेत्रातील ३२ मिळून जिल्ह्यातील एकूण ६१ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली.

सुरुवातीला अतिशय संथ गतिने सुरु झालेले मतदान दुपारनंतर वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागल्याचेही दिसून आले. मतदानानंतर सर्व मतपेट्‍या सुरक्षितरित्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय गोदामात आणण्यात आल्या. सदर ठिकाणी सर्व मतपेट्‍या एकत्र ठेवण्यात येतील व त्यानंतर पोलिस संरक्षणात बडनेरा येथे मतमोजणी स्थळी नेण्यात येतील.

गुरुवारी मतमोजणी

निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता. २‎ फेब्रुवारी) सकाळी ६ वाजतापासून‎ नेमानी गोडाऊन, बडनेरा रोड येथे‎ करण्यात येणार आहे.‎ या निवडणुकीत सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील, कॉंग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. अनिल अमलकार, शरद झांबरे, काँग्रेसचे बंडखोर श्याम प्रजापती, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यासह २३ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे.

नाव शोधण्यासाठी लावले स्टॉल

मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी पोहणाऱ्या मतदारांना मतदान यादीमध्ये नाव शोधता यावे यासाठी विविध उमेदवारांनी त्यांचे स्टॉल मतदान केंद्रापासून जवळच लावल्याचे दिसून आले. त्यामुळे याठिकाणी पोहचून मतदारांनी त्यांचे यादीतील नाव बघितले. त्यानंतर ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले, तर काही मतदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन त्यांचे नाव शोधले.

मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतरित्या पार पडली. सुरक्षेच्या दृष्टीने मतदान केंद्रावर महिला व पुरुष पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जिल्ह्यात असे झाले मतदान

मतदार - प्रत्यक्ष झालेले मतदान

पुरुष - ३१७६९ - १६३२०

स्त्री - १८८३१ - ७४२०

इतर - ०६ - ००

एकूण - ५०५०६ - २३७४०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com