youth injured in car hit
sakal
चिखली - राजकारण्यांच्या गाड्यांचा बेफाम वेग पुन्हा एकदा निष्पाप नागरिकाच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना चिखली घडली. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक (रा. वाशीम) यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या कृष्णा नंदू लष्कर (वय-25), रा. गौरक्षण वाडी, चिखली या तरुणास जोरदार धडक दिली. ही घटना आज ता. १८ सप्टेंबर रोजी सकाळी शहरातील पानगोळे हॉस्पिटलसमोर घडली.