
अकोला : शिक्षक पदभरतीचा गाजावाजा होत असताना, प्रत्यक्षात मात्र माध्यमिक शाळांतील शिक्षकांची टंचाई गंभीर पातळीवर पोहोचली आहे. पवित्र पोर्टलद्वारे फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील २४२ पदांपैकी फक्त ४९ पदे भरली गेली असून, तब्बल १९३ पदे रिक्त असल्याची आकडेवारी हाती आली आहे. एकीकडे पवित्र पोर्टलचा गोंधळ उडालेला असताना अधिकारी मात्र, पात्र उमेदवाराच मिळत नसल्याचे कारण पुढे करत आहेत.