esakal | वाळू माफियांची तहसील कर्मचार्‍यांना धक्काबुक्की
sakal

बोलून बातमी शोधा

वाळू माफियांची तहसील कर्मचार्‍यांना धक्काबुक्की

वाळू माफियांची तहसील कर्मचार्‍यांना धक्काबुक्की

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिखली : बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍या माफियांनी तहसील कर्मचार्‍यांनी वाळूचे वाहन कारवाईदरम्यान पकडले असता त्यांना धक्काबुक्की करण्याची घटना 9 जुलैला रात्री 9 ते 9.30 वाजेदरम्यान घडली होती. याप्रकरणी बेकायदेशीर गौण खनिज तस्करी करणार्‍या वाळू माफियांवर मोक्का कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे करण्यात आली. (Tehsil employees pushed by sand mafia)

चिखली तहसीलदारांच्या आदेशान्वये बेकायदेशीर गौण खनिज तस्करीरवर प्रतिबंध करण्याकरिता डॉ.निकेतन भगवंतराव वाळे, नायब तहसीलदार, विनोद गिरी तलाठी, योगेश भुसारी तलाठी व अनिरुद्ध खेडेकर तलाठी उंद्री हे शासकीय वाहनचालक संतोष भोपळे यांचेसह शासकीय विश्रामगृहासमोर असताना देऊळगांवराजाकडून एक पिवळ्या रंगाचे टिप्पर क्रमांक एमएच 37 टी 0248 येताना दिसून आले. तपासणीदरम्यान, माधव जेठे, उद्धव जेठे व योगेश जाधव तेथे येऊन सदर वाहन ताबडतोब सोडा अन्यथा परिणाम वाईट होतील असे बोलून धक्काबुक्की करीत लोटपोट केली.

हेही वाचा: खोटे कागदपत्रे तयार करुन जमिन हडपली!

याप्रकरणी नायब तहसीलदार डॉ.वाळे यांनी चिखली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी टिप्पर चालक, क्लीनर, माधव जेठे, उद्धव जेठे, योगेश जाधव यांचेवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अद्यापही अटक केलेली नाही. सदर आरोपींवर यापूर्वीसुद्धा अनेक गुन्हे दाखल असून संबंधित वाळू माफिया हे अट्टल गुन्हेगार असल्याचे दिसून येत असून तहसील कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना गौण खनिज तस्करांकडून धोका निर्माण झाला असून यातील आरोपींना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे.

Tehsil employees pushed by sand mafia

loading image