रास्तभाव दुकानाकरीता प्रस्ताव आमंत्रित

विवेक मेतकर
Friday, 16 October 2020

स्‍वयंसहायता गटांची निवड करतांना स्‍थानिक महिला स्‍वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्‍य राहील. महिला स्‍वयंसहायता गट उपलब्‍ध न झाल्‍यास पुरूष स्‍वयंसहायता गटाचा विचार करण्‍यात येईल.

अकोला : अकोला जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत स्‍वयंसहायता गटांकडून नवीन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव (ता. 15 ते 30 ऑक्टोंबर) पर्यंत कार्यालयीन वेळी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावे. नवीन शिधावाटप दुकाने परवाना अर्जाचे नमुने प्रत्येकी शंभर रुपये भरुन प्राप्त होतील.

हे ही वाचा : थरारक : तिहेरी हत्याकांडाने बुलडाणा जिल्हा हादरला 

पातूर तालुक्यातील चांगेफळ, पळसखेड, खानापूर, पार्डी, विवरा (श्री.किरतकार यांचे दुकान क्र.89), जांभ्ज्ञरुण, हिंगणा (वा), सोनुना, कोठारी खुर्द, गोळेगांव या दहा गावातील दुकानाकरीता जाहिरनामे काढण्यात येणार आहे. तर बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा, धानोरा, कासमारा, किनखेड, निहीदा, लोहगड, महागाव, निंबी बु., पिंजर, पार्डी, पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे बु.,राहीत, शुलु खुर्द, वाघा, तामशी, भेंडी सुत्रक, बहिखेड छावणी, फेट्रा, मिर्झापुर, शहापुर, टाकळी छाबीले, टिटवन व निंबी कोस या 25 गावातील दुकानाकरीता जाहिरनामे काढण्यात येणार आहे.

हे ही वाचा : मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी

स्‍वयंसहायता गटांची निवड करतांना स्‍थानिक महिला स्‍वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्‍य राहील. महिला स्‍वयंसहायता गट उपलब्‍ध न झाल्‍यास पुरूष स्‍वयंसहायता गटाचा विचार करण्‍यात येईल. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे. विहीत नमुन्‍यातील अर्ज (अध्‍यक्ष व सचिव सुस्‍पष्‍ट फोटोसह), अध्‍यक्ष व सचिव यांचा एकत्रित फोटो, स्‍वयंसहायता गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, स्‍वयंसहायता गटाचे आर्थिक स्थितीबाबत साक्षांकित कागदपत्रे, उदा. पासबुक व बँकेचे प्रमाणपत्र, व्‍यवसाय करावयाच्‍या जागेचे मालकीबाबत कागदपत्रे, जागा भाडयाची असल्‍यास भाडेपत्र, घरटॅक्‍स पावती, जागेचा 7/12, जागेचे क्षेत्रफळ, व्‍यवसाय ठिकाणचे क्षेत्र (चौ.फुट), बँकेकडून घेतलेल्‍या कर्जाचे व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेकडून प्राप्‍त झालेले), आंकेक्षन अहवाल मागील तीन वर्षाचा, स्‍वयंसहायता गटातील अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, सचिव व सर्व सभासदांची नांवे पत्‍यांसह, गटाचे मूळ व आजचे भाग भांडवल व सध्‍या करीत असलेला व्‍यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती, रास्‍तभाव व किरकोळ केरोसीन परवाना मिळण्‍याबाबत व व्‍यवसाय करण्‍यात संमती दर्शविलेला गटाचा ठराव, रास्‍तभाव व केरोसीन परवाना स्‍वयंसहायता गट स्‍वत: एकत्रितरीत्‍या चालवित आणि कोणत्‍याही इतर व्यक्ती, संस्‍थेला चालविण्‍यास देणार नाही. याबाबत सर्व सदस्‍यांचे एकत्रीत प्रतिज्ञापत्र (तहसिलदार यांचेकडून साक्षांकित केलेले) मूळ प्रत, अर्ज त्‍याच भागातील स्‍वयंसहायता गटांनी करावयाचे आहेत.

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsil office in Akola district invites proposals from self help groups for new fair price shops