esakal | कोरोनाचे आणखी दहा बळी!

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे आणखी दहा बळी!
कोरोनाचे आणखी दहा बळी!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त दहा रुग्णांचा रविवारी (ता. २५) मृत्यू झाला. त्यासोबतच ४६९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कोरोनाचे ५ हजार ९९७ ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत व आतापर्यंत मृतकांची संख्या ६२९ झाली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. २५) जिल्ह्यात २ हजार २२८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ८३९ अहवाल निगेटिव्ह तर ३८९ अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरिक्त रॅपिडच्या चाचणीत ८० जण पॉझिटिव्ह आढल्यामुळे रविवारी ६४९ नव्या रुग्णांची भर पडली. त्यासोबतच रुग्णालयातून ७७५ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. मूर्तिजापूरमध्ये कोरोनाचे ३६, अकोट-४३, बाळापूर-आठ, बार्शीटाकळी- २५, पातूर-११, अकोला ग्रामीणमध्ये ३४ तर अकोला मनपा क्षेत्रात २३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
--------------------
असे आहेत मृतक
- रविवारी पहिला मृत्यू चैतन्य नगर, सिव्हील लाईन येथील ६० वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २३ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.
- दुसरा मृत्यू शिवाजी नगर येथील ५८ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते.
- तिसरा मृत्यू बार्शीटाकळी येथील ५९ वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते.
- चौथा मृत्यू डाबकी रोड येथील ८२ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते.
- पाचवा मृत्यू वरखेड ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिलेचा झाला. या महिलेस दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते.
- सहावा मृत्यू दहिहांडा ता. अकोट येथील ६३ वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते.
- सातवा मृत्यू टाकळी बु. ता. अकोट येथील ६५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते.
- आठवा मृत्यू पातूर येथील ८० वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते.
- नऊवा मृत्यू अन्वी मिर्झापूर येथील ४० वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते.
- दहावा मृत्यू ७० वर्षीय अज्ञात पुरुष रुग्णाचा झाला. २४ एप्रिल रोजी सदर व्यक्तीस मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते.
--------------
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ३७६७२
- मयत - ६२९
- डिस्चार्ज - ३१०४६
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५९९७