esakal | आणखी दहा रुग्णांचा मृत्यू, ६७२ नवे रुग्ण आढळले

बोलून बातमी शोधा

आणखी दहा रुग्णांचा मृत्यू, ६७२ नवे रुग्ण आढळले
आणखी दहा रुग्णांचा मृत्यू, ६७२ नवे रुग्ण आढळले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त १० रुग्णांचा गुरुवारी (ता. २९) मृत्यू झाला. त्यासोबतच ६७२ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ४३८ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. त्यामुळे सद्या जिल्ह्यात ५ हजार २४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. २९) २ हजार ५५३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ४९ अहवाल निगेटिव्ह तर ५०४ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत १६८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण ६७२ नव्या रुग्णांची भर पडली. मूर्तिजापूर तालुक्यात मूर्तिजापूर ७८, अकोट-६७, बाळापूर-२५, तेल्हारा-३७, बार्शीटाकळी-२० पातूर-३३, अकोला ग्रामीणमध्ये २८ तर अकोला मनपा क्षेत्रात २१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

असे झाले मृत्यू

- अक्कलकोट भोईपूरा येथील ७६ वर्षीय पुरुष, कैलास नगर येथील ५५ वर्षीय महिला, जनुना ता. बार्शीटाकळी येथील ५५ वर्षीय महिला, मोठी उमरी ताथोड नगर येथील ६८ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ४२ वर्षीय महिला, अकोट येथील ७२ वर्षीय पुरुष, पारस ता. बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष, दहिहांडा येथील ८१ वर्षीय पुरुष, दोन जणांचे खासगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात मिर्झापूर अन्वी येथील ६२ वर्षीय पुरुष व तर अन्य येथील ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - ३९६२३

- मयत - ६७८

- डिस्चार्ज - ३३७०१

- ॲक्टिव्ह रूग्ण - ५२४४

संपादन - विवेक मेतकर