esakal | सीएससी सेंटर आता दुपारपर्यंत राहणार सुरू

बोलून बातमी शोधा

सीएससी सेंटर आता दुपारपर्यंत राहणार  सुरू
सीएससी सेंटर आता दुपारपर्यंत राहणार सुरू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात १५ मेपर्यंत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. मात्र, नागरिकांची अडचण लक्षात घेता जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागातील सीएससी सेंटर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. CSC center will now continue till noon याशिवाय सनदी लेखापाल व सरफांनाही नियमात सवलत देण्यात आली आहे.

सध्या खरीपाच्या तयारीला शेतकरी लागला आहे. पीक कर्ज व इतर दाखले त्यांना लागतात. शैक्षणिक कारणास्तवही नागरिकांना विविध दाखल्यांची गरज भासते. तयामुळे जिल्ह्यातील सीएससी सेंटर सुरू ठेवण्याबाबत विनंती सीएससी संचालकांमार्फत करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी पापळकर यांनी ता. १५ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउनच्या नियमात काही सुधारणारा करणार आदेश जाहीर केला. त्यात महानगरपालिका व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सीएससी सेंटर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे.

सनदी लेखापालांना रात्री ८ पर्यंत सवलत

जिल्ह्यातील सनदी लेखापालांना त्यांची कार्यालये आता सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरू ठेवता येणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिला.

सरफांना गुरुवारी तपासणीसाठी सवलत

जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सराफा व्यावसायिकांची प्रतिष्ठाने बंद आहेत. त्यांना त्यांच्या दुकानातील मालाची तपासणी करण्याकरिता गुरवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सलवत देण्यात आली आहे.