अकोला : रिसोडच्या मुख्य रस्त्याचा वनवास संपेना

राजकीय कुरघोडीत जनता बेजार; अर्धवट रस्त्याने अपघातात वाढ, नागरिकांवर टांगती तलवार
road
roadsakal

रिसोड : जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसोड शहरात एक माजी खासदार, विद्यमान खासदार, आमदार राहतात मात्र, या शहरातील सिव्हिल लाईन्स रस्त्याचा वनवास गेल्या चार वर्षांपासून सुरूच आहे. कधी काम सुरू होते, कधी राजकीय साठमारीत बंद पडते. यामुळे नागरीकांची होरपळ होत आहे.

रिसोड शहरातील सिव्हिल लाईन रस्ता हा महत्त्वाचा रस्ता आहे. सर्व सरकारी कार्यालयं, व्यापारी प्रतिष्ठाने, दवाखाने, पेट्रोल पंप, शाळा महाविद्यालये याच रस्त्यावर आहेत. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा रस्ता नाल्यागत झाला आहे. या रस्त्याच्या बांधकामाला गतवर्षी मान्यता मिळाली होती मात्र, तो सुरू होण्यास एक वर्षाचा कालावधी लागला. श्रेयवाद आणि राजकीय साठमारीत नागरिकांच्या हालआपेष्टा दुय्यम ठरल्या.

road
औरंगाबाद : बिबट्याचा मुक्काम आता पाटोदा शिवारात

आता चार महिन्यापूर्वी या रस्त्याच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली होती. कालुशा बाबा दर्गाह ते वाशीम नाका रोडचे सार्वजनिक बांधकाम विभाग या यंत्रणेच्या माध्यमातून सिमेंट रोडचे काम करण्यात येत आहे. या मार्गाची पार्श्वभूमी अशी की, हा मार्ग रिसोड मधील महत्त्वपूर्ण असलेली व्यापार लाईनमधील (सिव्हिल लाईन) असून, तो रस्ता मुख्य रहदारीचा आहे.

हा रस्ता मागील तीन वर्षापासून दूरवस्थेत आहे. परंतु, हा रस्ता मागील कालावधीमध्ये मंजूर झालेला असताना त्याचे कामकाज कोरोना महामारीमुळे रखडलेले होते. तदनंतर राजकीय चढाओढी व श्रेयवादामुळे या रस्त्याचे कामकाज सुरु झालेले नाही. सप्टेंबर २०२१ रोजी सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खोदण्यात आलेली आहे. रस्त्याचे काम ५० टक्के झालेले असताना उर्वरित काम बंद झाले आहे.

road
जळगाव : जिल्ह्यात रुग्ण घटले अन्‌ लसीकरणही मंदावले

व्यापाऱ्यांचे निवेदन

शहरातील व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याने व्यापारी मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला आहे. रिसोडमधील राजकीय व्यक्तींनी काही लोकांना हाताशी धरून ठेकेदाराला त्याचे वाहने फोडण्याच्या व इतर धमक्या देवून काम बंद करण्यात आल्याचे कळत आहे. हा रस्ता रिसोडच्या अस्मितेचा प्रश्न झालेला असून, त्याचे कामकाज आहे त्या स्थितीमुळे रहदारी मोठ्या प्रमाणात बंद झालेली आहे. त्यामुळे सर्व व्यापारी लोकांवर उपासमारीची व आर्थिक नुकसानीची स्थिती ओढवत आहे.

या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले नाही तर, यापुढे होणाऱ्या त्यांच्या आर्थिक व व्यावसायिक नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील. कालुशा बाबा दर्गाह ते वाशीम नाका रोडचे रखडलेले काम तत्काळ सुरू करण्यात यावे व हे कामकाज आर्थिक लाभाकरिता किंवा राजकीय द्वेषातून काम बंद करण्याऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाही करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करू, असा इशारा व्यापारी मंडळाने दिला आहे. निवेदनावर राजु राऊत, दांदडे भाऊजी, दशरथ साबळे, कैलास माळेकर, निरंजन गरकळ, रवि कंदोइ, डॉ. बोडखे, संदीप मोरे, विजय घोडके, केशव गरकळ, गजानन नरवाडे, रवि कानडे, विलास सेवतकर, अश्विन तुरुकमाने, गजानन देशमाने, भगवान नप्ते, बाळू माळेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com