विचित्र प्रकार; झाडाला अडकला मैना पक्षी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विचित्र प्रकार; झाडाला अडकला मैना पक्षी

विचित्र प्रकार; झाडाला अडकला मैना पक्षी

हातगाव (जि.अकोला) : अमरावती हायवेवर येणाऱ्या नागोली नागठाणा या गावात विचित्र प्रकार पाहायला मिळाले. पिंपळवृक्षावर एक काळया रंगाच्या मैना ग्रामस्थांना दिसली झाडावर धाग्याने लटकलेली. (The myna bird got stuck in a tree and died)

काही लोकांना वाटले बालकांनी हा खोडसाळपणा केला असावा ,पण डहाळी लहान असल्याने कोणी कोणाच्या हात तिथे पोहचू शकत नव्हते, नंतर लक्षात आले की बाजूलाच त्या पक्षाचे घरटे होते.

उष्णतेचा दाह लक्षात घेत ते पक्षी घरटे विणत असावी आणि विणता विणता तोल जाऊन धागा गळ्यात अडकला असावा अशी शंका वर्तवण्यात येत आहे. हा प्रकार घडल्याने गावकरी अचंबितच झाले. असला प्रकार आकर्षण अनभोरे,हर्षल अनभोरे,वर्षा अनभोरे,ललिता अनभोरे यांच्या लक्षात आला.

हेही वाचा: पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय

मैना शक्यतोवर घरांच्या छित्रात किंवा खांबांवर आपले घरटे बनविते. ती क्वचितच झाडावार घरटे बनवते. घरटे बनवताना काड्या किंवा कापडाच्या चिंद्यांचा वापर होतो. हा प्रकार बघता मैना घरटे बनवित असताना अडकल्याची शक्यता वाटते.

- लक्ष्मीशंकर यादव, पक्षी संशोधक अकोला.

संपादन - विवेक मेतकर

The myna bird got stuck in a tree and died

loading image
go to top