पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय

पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय

आर्थिक फायद्यासाठी महिला व मुलींना पैश्याचे अमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्याकरीता प्रवृत्त केल्या जात होते. ग्राहकांना आवश्यकते नुसार पैशाचे मोबदल्यात महिला व मुंलीचा पुरवठा करून महिला व मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली.

अकोला ः रामदासपेठ पोलिस स्टेशन (Ramdaspeth Police) अंतर्गत येणाऱ्या उच्चभ्रू वस्तीत एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय (Sex Racket) पोलिसांनी उघडकीस आणला. गुरुवारी पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी केलेल्या कारवाईत दोन आरोपींना एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत अटक करण्यात आले.
जठारपेठ परिसरातील सातव चौकापुढे असलेल्या प्रसाद कॉलनी येथील ओंकार अर्पाटमेटमध्ये फ्लॅट क्रमांक सहामध्ये मुली व महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे कडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. रामदासपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांना याबाबत मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात येथे कारवाई करण्यात आली. (The prostitution business was started in an upscale neighborhood in Akola)

महिला पोलिस उपनिरीक्षक महाजन यांनी महिला पंचा समक्ष पोलिस कर्मचाऱ्यांच्या मतदीने सातव चौकातील ओंकार अर्पाटमेंट मधील फ्लॅट क्र.६ येथे छापा टाकला. तेथे दोन युवक एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. यावेळी ऋषीकेश संजय मालोकार (२२) रा. अंबिकापूर व अनंत नागोराव गांवडे (२३) राहणार दापुरा यांना आक्षेपार्ह महिलेसोबत आढळून आल्याने ताब्यात घेण्यात आले. या ठीकाणी आक्षेपार्ह वस्तू तसेच एक ॲक्टिवा स्कुटर व तीन मोबाईल फोन असा एकूण ६७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


वेश्या व्यवसायाचा सूत्रधार अमरावती जिल्ह्यातील
रामदासपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले दोन युवक व महिलेकडे पोलिसांनी विचारणा केली असताया वेश्या व्यवसायाचे तार अमरावती जिल्ह्यापर्यंत जुळले असल्याची माहिती मिळाली. अमरावती जिल्ह्यातील रुस्तमपूर येथील आरोपी विकी विजय कवळे (२३) हा आर्थिक फायद्यासाठी महिला व मुलींना पैश्याचे अमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्याकरीता प्रवृत्त करीत होता. ग्राहकांना आवश्यकते नुसार पैशाचे मोबदल्यात महिला व मुंलीचा पुरवठा करून महिला व मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महिला पोलिस उपनिरीक्षक महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोदविण्यात आला आहे.

संपादन - विवेक मेतकर

The prostitution business was started in an upscale neighborhood in Akola

टॅग्स :Akola