आरोग्य विभागाचा पेपर विभागाच्या चुकीनेच फुटला

उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेनुसार उत्तर पत्रिका तपासून बघितली.
exam
exam sakal
Updated on: 

अकोला : आरोग्य विभागाच्या ‘क’ व ‘ड’ वर्ग पदांसाठी झालेल्या लेखी परीक्षेला पेपर फुटीचे गालबोट लागले होते. मात्र, प्रत्यक्षात पेपर फुटलाच नाही, तर परीक्षा घेणाऱ्या विभागाच्या चुकीनेच आठ दिवसांनंतर होणाऱ्या परीक्षेचा पेपर आधीच ‘क’ वर्ग पदासाठी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थिंना देण्यात आला होता. हाच पेपर ता. ३१ ऑक्टोबरला झालेल्या लेखी परीक्षेतही आल्याने पेपर फुटीची ओरड झाली. चुकीचे पेपर दिल्याबद्दल उमेदवाराने आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही त्याच्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

आरोग्या विभागातील ‘क’ वर्ग पदासाठीची लेखी परीक्षा ता २४ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेकरिता देण्याता आलेला पेपर उमेदवारांनी सोडविल्यानंतर त्याची उत्तर पत्रिका ता. २९ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेनुसार उत्तर पत्रिका तपासून बघितली. तेव्हा प्रश्न व उत्तरांचा कुठेच ताळमेळ बसला नाही. त्यानंतर दोन दिवस दिवसांनी ता. ३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागातर्फे ‘ड’ वर्ग पदांसाठी लेखी परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आली.

यावेळी उमेदवारांना देण्यात आलेल्या पेपर पैकी एक पेपर संच हा आधीच उमेदवारांच्या हाती पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पेपर फुटल्याचा आरोपही झाला. पेपर आटोपल्यानंतर ‘क’ वर्गासाठी लेखी परीक्षा देणाऱ्या अकोल्यातील शारदा निरंजन येवले या उमेदवाराने तिच्याकडे असलेला पेपर हा ‘ड’ वर्ग पेपरशी जुळवून बघितला. त्यानंतर उत्तर पत्रिकेसोबतही जुळवून बघितला असता तो सारखाच असल्याचे आढळून आले. त्यामुळे ‘क’ वर्ग पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेच्या वेळसच ‘ड’ वर्ग पदासाठीचा पेपर उमेदवारांच्या हाती पडला होता.

हाच पेपर पुढे ता.३१ ऑक्टोबरलाही उमेदवारांना लेखी परीक्षेच्या वेळेस मिळाल्याने पेपर फुटल्याचे आरोप झाले. प्रत्यक्षात पेपर फुटलाच नाही, तर विभागाच्या चुकीनेच तो वेळेपूर्वीच अन्य पदाच्या उमेदवारांनी लेखी परीक्षेच्या वेळेस देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत शारदा निरंजन येवले या उमेदवाराने आरोग्य विभागाकडे तक्रार केली. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

पेपर फुटीसाठी जबाबदार कुणाला ठरवणार?

आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या विभागाच्या चुकीनेच २४ तारखेचाल ३१ ऑक्टोबरच्या परीक्षेचा पेपर उमेदवारांच्या हातात पडला. ‘क’ वर्ग पदाची परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांनी ‘ड’ वर्गाची परीक्षाही दिली. त्यामुळे अनेक उमेदवारांकडे आठवडाभरापूर्वीच लेखी परीक्षेचा पेपर पडला होता. हा घोळच पेपर फुटीसाठी कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे आता पेपर फुटीसाठी आरोग्य विभाग कुणाला जबाबदार ठरवणार, असा प्रश्न उमेदवार उपस्थित करू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com