esakal | ऑक्सिजनच्या खाटांसाठी खाटाटोप सुरू

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजनच्या खाटांसाठी खाटाटोप सुरू!
ऑक्सिजनच्या खाटांसाठी खाटाटोप सुरू!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाच्या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा (बेड) उपलब्ध नसल्याची बाब मंगळवारी (ता. २७) समोर आली. तर आरकेटीमध्ये केवळ १, जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑक्सिजनच्या केवळ ०४ खाटाच रुग्णांसाठी शिल्लक असल्याने ऑक्सिजन खाटांसाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची परवड होत असल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा मोजक्याच खाटा उपलब्ध असल्याने त्यासाठी सुद्धा रुग्णांना वेटिंगवर रहावे लागत आहे.

नोव्हेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च, एप्रिल २०२० पासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव, खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर २०२० मध्ये तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली होती. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली होती. दरम्यान आता जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनच्या खाटा मिळणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. परिणामी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा: दोन खासदार, सहा आमदार तरीही जनता बेजार!

अशी आहे स्थिती

- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात मंगळवारी (ता. २६) ऑक्सिजनची एकही खाट उपलब्ध झाली नाही. आरकेटी अकोलामध्ये ०१ व जिल्हा स्त्री रुग्णालयात ०४ ऑक्सिजनच्या खाटा रिक्त असल्याची माहिती मिळाली.

- खासगीतील ८ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या ५३ खाटा रिक्त मंगळवारी रिक्त होत्या. परंतु त्याठिकाणी सुद्धा रुग्णांना भरती करण्यासाठी वेटिंग लिस्ट पाहायला मिळाली.

संपादन - विवेक मेतकर