
आरक्षणावर सहा दिवसांत एकही आक्षेप नाही!
अकोला - महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या सामाजिक व महिला आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर त्यावर आक्षेप, सूचना व हरकतीसाठी दिलेली मुदत ता. ६ जून रोजी दुपारी ३ वाजता संपली. या काळात अकोला महानगरपालिका क्षेत्रातून आरक्षणावर एकही आक्षेप नोंदविण्यात आला नाही. अकोला महानगरपालिकेच्या ३० प्रभागातील ९१ सदस्यांपैकी ४६ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. त्याची सोडत ता. ३१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काढण्यात आली होती.
निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार आरक्षणावर आक्षेप हरकती घेण्यासाठी १ ते ६ जून असे सहा दिवसांची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत अकोला महानगरपालिकेच्या ३० प्रभागातून एकही आक्षेप किंवा हरकत नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे आरक्षण हे नियमानुसार झाल्याचे शिक्कामोर्तब झाले. आता आरक्षणाचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर झाल्यानंतर आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम कधी घोषित केला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अशी आहे आरक्षणाची स्थिती
अनुसूचित जाती : १५ महिला आरक्षण ः ८
अनुसूचित जमाती : २ महिला आरक्षण ः १
सर्वसाधारण : ७४ महिला आरक्षण ः ३७
एकूण : ९१ महिला आरक्षण ः ४६
Web Title: There Is No Objection To Reservation Within Six Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..