चला आता शिक्षकांच्या होणार बदल्या, शासनाने दिला हिरवा कंदिल

सुगत खाडे  
Friday, 28 August 2020

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला शासनाकडून बुधवारी हिरवा कंदिल दाखविण्यात आला. बिंदू नामावलीचे पालन करून बिंदू ते बिंदू बदली आदेश देण्यात आल्याने शिक्षकांना कार्यमुक्त व रूजू करून घेण्यात यावे, असे आदेश ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.

अकाेला :  शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला शासनाकडून बुधवारी हिरवा कंदिल दाखविण्यात आला. बिंदू नामावलीचे पालन करून बिंदू ते बिंदू बदली आदेश देण्यात आल्याने शिक्षकांना कार्यमुक्त व रूजू करून घेण्यात यावे, असे आदेश ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. याबाबत जि.प. प्रशासनाने शासनाकडून मार्गदर्शन मागितले हाेते.

आंतरजिल्हा बदली, प्रतिनियुक्ती, बदली, भरतीसाठी जि.प.मध्ये साखळीच सक्रिय आहे. आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेसाठी तर संबंधित शिक्षकांकडून लाखाे रुपये उकळण्यात येतात. अनेकदा तर एकतर्फी बदलीने शिक्षक अकाेल्यात रूजू हाेतात.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यंदाही जुलैमध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात अकोला जिल्ह्यातील एकूण २१ शिक्षकांना इतर जिल्ह्यात बदली देण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यातून अकाेल्यात रूजू हाेणाऱ्या शिक्षकांची संख्या २८ आहे.

example

या शिक्षकांना रूजू करून घेताना संबंधित जिल्ह्याची बिंदू नामावली बिघडण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकांना कार्यमुक्त करणे व इतर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना रूजू करून घेण्याची प्रक्रिया रखली होती.

अकोला जिल्ह्यातील आंतर जिल्हा बदलीची स्थिती
मराठी माध्यम

  • अकाेला जिल्ह्यातून १९ शिक्षकांना इतर जिल्ह्यात बदली मिळाली आहे.
  • १४ शिक्षक अन्य जिल्ह्यातून अकाेल्यात येणार आहेत.
  • या शिक्षकांमध्ये वाशीम, हिंगाेली, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे.

 
उर्दू माध्यम

  •  अकाेला जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात दाेन शिक्षकांना बदली देण्यात आली आहे.
  • इतर जिल्ह्यातून अकाेला जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांची संख्या १४ आहे.
  • या शिक्षकांमध्ये अमरावती, यवतमाळ, नगर आदी जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे.
  • (संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be changes of teachers in Akola