दीर्घ विश्रांतीनंतर दाटले ढग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Storm rains crisis again; Losses of disabled farmers

दीर्घ विश्रांतीनंतर दाटले ढग!

अकोला : दीर्घ विश्रांतीनंतर अकोला जिल्ह्यासह विदर्भात पावसाचे ढग दाटून आले असून, अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ व इतर जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस जोरदार तसेच मुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनच्या आगमनानंतर अवघ्या दोन दिवसातच पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठड्यापासून अकोला जिल्ह्यासह विदर्भात मॉन्सून सक्रीय होऊन, सततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचे नुकसान झाले.

त्यानंतर मात्र, जवळपास महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने पिके संकटात सापडली होती व शेतकऱ्यांकडून पावसाची प्रतीक्षा सुरू होती. आठवडाभरापूर्वी तसेच दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावून काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला परंतु, अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी करीत आहेत. आता पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले असून, अकोल्यासह विदर्भात पुढील तीन दिवस जोरदार तसेच मुसळधार पावसाचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत. त्यामध्ये अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, हिंगोली, नंदुरबार, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इत्यादी भागात ११ व १२ सप्टेंबर दरम्यान बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार तर, एखाद दोन ठिकाणी मुसळधार पावसाच्या शक्यता १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी बहुदा हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता, काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जिल्ह्याला तीन दिवस येलो अलर्ट

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्याला दि.१५ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट मिळाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस पिकांसाठी पोषक असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दोन-तीन दिवसांपासून उष्णतेने त्रस्त असलेल्या अकोलेकराना दिलासा मिळाला.

बाळापूर तालुक्यात पुन्हा मुसळधार

बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने शेत शिवार जलमय दिसून आले. निंबा फाटा ते काजिखेड या मार्गावर वादळ वाऱ्यामुळे दोन ते तीन झाडे पडले होते. या पावसाने सोयाबीनचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.

बंगालच्या उपसागरात दोन-तीन दिवसात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भ, उत्तर कोकण, नाशिक, मराठवाडा, पुणे विभागात पुढील दोन ते तीन दिवस गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

- संजय अप्तुरकर, हवामान अभ्याक, मुंबईबाळापूर तालुक्यात पुन्हा मुसळधार

Web Title: Thick Clouds After A Long Break Akola Rain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..