

Three brothers selected in BSF, proudly representing their family and the nation.
Sakal
मंगरूळपीर: तालुक्यातील जनुना (खुर्द) हे काटेपूर्णा अभयारण्याच्या कुशीत वसलेले, सुमारे २५० लोकसंख्या असलेले १०० टक्के आदिवासी समाजाचे लहानसे गाव. आजही पक्का रस्ता नसलेल्या या दुर्गम गावातून एकाच कुटुंबातील तीनही भावंडांनी देशसेवेचा ध्यास घेत सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) निवड मिळवून संपूर्ण गावपाड्यासह वाशीम जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.